मुण्डक उपनिषद कोणत्या काळात लिहिले गेले? त्यातील ‘सत्यमेव जयते’ हे वाक्य चार सिंह असणाऱ्या अशोक स्तंभावर आढळते का?
इ.स.पू.१५०० ते इ.स.पू.६०० पर्यंतचा काळ म्हणजे वैदिक संस्कृतीचा कालखंड होय.वैदिक साहित्यात चार प्रकारच्या ग्रंथांचा अंतर्भाव होतो,ते म्हणजे-
- संहिता/चार वेद.
- ब्राह्मणे.
- आरण्यके.
- उपनिषदे.
'उपनिषद' या शब्दाचा मूळ अर्थ - गूढज्ञानासाठी विद्यार्थ्याने गुरूजवळ बसणे होय.अशा एकांत बैठकीत गुरूने सांगितलेल्या ज्ञानाचा संग्रह उपनिषदांत आहे.मुक्तिकोपनिषदानुसार उपनिषदांची संख्या १०८ इतकी मानली जाते.या मध्ये असलेल्या 'मुंडक' या उपनिषदातील ' सत्यमेव जयते ' या शब्दाचा अर्थ 'नेहमी सत्याचाच विजय होतो' असा आहे.
सम्राट अशोक यांच्या काळात ( इ.स.पू.३ रे शतक) उभारलेला सारनाथ येथील अशोकस्तंभ एकाश्म कोरीवकाम असून ते सर्वोत्कृष्ट कलेचे मानचिन्ह आहे.या स्तंभशीर्षावरील चौमुखसिंहाची प्रतिमा भारतीय संघराज्याने आपली राजमुद्रा म्हणून स्वीकारली व त्याखाली बोधवाक्य म्हणून या उपनिषदातील 'सत्यमेव जयते' चा स्वीकार केला.हे उपनिषद व या अशोकस्तंभाच्या निर्मितीचा काळ भिन्न असल्याने हे बोधवचन स्तंभावर आढळून येत नाही.फक्त त्या दोन्हीचा सुरेख संगम साधून बोधवाक्ययुक्त राजमुद्रा तयार केली गेली.
Comments
Post a Comment