देवदत्ताने नालागिरी हत्तीला ताडी पाजून बुध्दांवर सोडले

#नालागिरिं गजवरं अतिमत्ति भूतं, दावग्गि चक्कमसनीव सुदारूणन्तं...
मंगल परिणयात ही जयमंगल अठ्ठगाथा नेहमी ऐकतो आपण.
देवदत्त हा नेहमीच सिध्दार्थाचा दुस्वास करी.सिध्दार्थाचा 'बुध्द' झाला पण देवदत्त काही बदलला नाही. संघात येऊन भिक्षूंना बुध्दाविरोधात भडकवणे,अजातसत्तुला ही जाऊन कानगुजला करणे,बुध्दांवर डोंगरावरुन मोठी शिळा फेकणे अशा प्रकारे त्याने अनेकदा बुध्दांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण तथागतांनी नेहमीच त्याला माफ केले. असेच एकदा राजगहला असताना देवदत्ताने #नालागिरी हत्तीला ताडी पाजून बुध्दांवर सोडले.नालागिरी समोर येईल त्याला उचलून फेकत होता.सोंडेत मुसळ पकडून गरागरा फिरवत होता.हे बघून लोक सैरावैरा पळत होते.अशीच एक स्त्री घाबरून तिच्या बाळाला रस्त्यावर सोडून पळाली.नालागिरी हत्ती मुलाला इजा करणार......

इतक्यात बुध्द तिथे येतात आणि आपल्या हातांनी #नालागिरी च्या मस्तकावर प्रेमाने थापटतात.त्यांचा तो स्पर्श आणि नजरेतील कारुण्य बघून तो शांत होतो...
सोबत काही शिल्पं आहेत बुध्द आणि नालागिरीची.अजिंठा लेणींमध्ये तर सबंध भिंतीवर #नालागिरी व बुध्द आणि रस्त्यावर लोकांची पळापळ,सज्जातून स्त्रीयांचं डोकावणं चित्रीत केलंय.एकदा बघून या.
बुध्दांना करुणासागर म्हणतात.त्यांची सजीवांप्रती असलेली करुणा आणि विश्वंभर मेत्ता ही अमुल्य देणगी होय.
Mangesh Jawale यांचे पोस्ट   (मंगेश जावळे,कल्याण.)

या शिल्पात काही गजपाल (माहूत) नालागिरी हत्तीला मोकळं सोडत आहेत, राजाच्या हत्तीशाळेतील हा हत्ती त्यांनी देवदत्ताच्या सांगण्यावरून मोकळा केला असावा.

Vijayendra Surwade हो ...अगदी बरोबर
तोच देखावा आहे...

नालागिरी हत्तीचे एक नाव धनपाल असेही आहे...


Comments

Popular posts from this blog

निषाद राज एकलव्य

तिब्बत देश का असली नाम " बोद " ( Bod ) है

The world’s 10 most awesome giant Buddhas