आर्य कोण होते? ते भारतात कोठून आले?

आर्य होते नाही , आर्य आहेत. वैदिक धर्माचे पालन करणारया प्रत्येक व्यक्तीला आर्य असे संबोधले जाते. फक्त हिंदूंच नाही तर बौद्ध धर्माचे पालन करणार्यांनासुद्धा आर्य असेच म्हटले जाते. गौतम बुद्धांची जी मूळ शिकवण आहे, त्याला "चार आर्यसत्य" असे म्हणतात. त्यामुळे बौद्ध धर्मीय सुद्धा आर्यच आहेत. आर्य या संस्कृत शब्दाचा अर्थ "सभ्य, नैतिक व सुसंस्कृत व्यक्ती" असा आहे.

आर्य भारतात कोठून आले नाही. ते मूळचे भारतातलेच आहेत. सिंधू आणि सरस्वती या नद्यांच्या काठावर जन्माला आलेल्या जगातील सर्वात पुरातन सभ्यतेचे लोक स्वत:ला आर्य म्हणत होते. हडप्पा, मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेले अवशेष कमीतकमी दहा हजार वर्षे जुने आहेत. याच सभ्यतेमधून नंतर वैदिक धर्म जन्माला आला. चार वेदांची रचना सरस्वती नदीच्या काठावर केली गेली आहे ‌. वेदांमध्ये सरस्वती नदीचा उल्लेख येतो आणि ती नदी आता दुर्दैवाने सुकून गेली आहे ‌.

अठराव्या - एकोणिसाव्या शतकात जेव्हा ब्रिटिशांनी वेदांचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना असे आढळून आले की भारतीय संस्कृती ही युरोपियन संस्कृतीपेक्षा हजारो वर्षे जुनी आहे. अर्थातच हे तथ्य वसाहतवादी ब्रिटिशांना सहन झाले नाही. त्यांना काहीही करून भारतीय लोक तुच्छ आहेत असे दाखवून द्यायचे होते. त्यातून ब्रिटिश हे ख्रिस्ती धर्माचे होते. ख्रिस्ती मिशनरी तेव्हाही हिंदू धर्माचा द्वेष करत होते आणि अजूनही करतात. त्यामुळे ब्रिटिशांनी बर्याच युरोपियन लेखकांना हाताशी धरून एक बनावट , धादांत खोटी थियरी तयार केली ज्याला Aryan Invasion Theory म्हटले जाते‌. या थियरी अनुसार आर्य हे मूळचे मध्य आशिया किंवा युरोप मधले आहेत. त्या आर्यांनी भारतात पाच हजार वर्षांपूर्वी आक्रमण केले आणि मूळचे निवासी जे द्रविड होते त्यांना दक्षिणेकडे ढकलले. या खोट्या थियरीचा एक विनासायास फायदा ब्रिटिशांना झाला तो म्हणजे भारतीय समाजात फूट पडली जी अजूनही अस्तित्वात आहे. फोडा आणि राज्य करा (Divide and conquer) अशी राजनीती असणार्या ब्रिटिशांना याचा खूप फायदा झाला.

आधुनिक काळात याच Aryan Invasion थियरीला Indo-European language या अजून एका नव्या खोट्या थियरीत रुपांतरीत केले गेले आहे. हा सगळा युरोपियन गोर्या लोकांचा स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे.

अर्थातच अशा आर्यांच्या आक्रमणाचा एकही पुरावा आजपर्यंत सापडला नाही. या थियरीत खूप त्रुटी आहेत. त्यातील सर्वात स्पष्ट त्रुटी - वेद हे मानवी इतिहासातील सर्वात जुने लेख आहेत. जर युरोपियन आर्यांनी खरोखरच भारतात आक्रमण केले होते, तर फक्त भारतातल्या आर्यांनीच का बरं वेद लिहून ठेवले? मध्य आशियात आणि युरोपातल्या आर्यांनी काहीच का लिहून ठेवले नाही?

आणि या थियरीचे असे म्हणणे आहे की आर्य हे भटके घोडेस्वार लोक होते . भटक्या जमाती वेदांसारखे महान साहित्य कसे काय निर्माण करु शकतात? अशा खूप त्रुटी असूनही ही खोटी थियरी भारतीयांवर लादली जाते आहे‌. संपूर्ण स्पष्टीकरणासाठी Professor David Frawley यांचा हा विडीयो पहावा.

The Myth of Aryan Invasion in India - Dr. David Frawley - India Inspires Talks

आर्य हे सिंधू संस्कृतीमध्ये उगम पावले आणि तिथून त्यांचा प्रसार युरोपच्या दिशेने झाला. युरोपमधल्या सर्व भाषा संस्कृतपासूनच तयार झाल्या आहेत. या सिद्धांताला Indigenous Aryan Theory किंवा Out of India theory असे म्हणतात. Indigenous Aryans - Wikipedia

या सिद्धांताला बायोलाॅजीमधून पुष्टी मिळते. जीवशास्त्रानुसार मानव प्रजातीचा जन्म अफ्रिका खंडात झाला. आधुनिक मानव म्हणजे होमो सेपियन हे अफ्रिकेत जन्माला आले आणि तेथून जगभरात पसरले. होमो सेपियन पहिल्यांदा आफ्रिकेतून भारतात आले आणि सिंधू नदीच्या खोऱ्यात त्यांनी आर्य संस्कृती स्थापन केली. हेच आर्य नंतर भारतामधून युरोपमध्ये गेले.


Comments

Popular posts from this blog

निषाद राज एकलव्य

तिब्बत देश का असली नाम " बोद " ( Bod ) है

The world’s 10 most awesome giant Buddhas