हंबरणारे काळीज तमाम झंजावाताचे पंख होतील
हंबरणारे काळीज तमाम झंजावाताचे पंख होतील
तहानेचे लाडु भुकेची भाकर खुडून खातील
कुणाच्या अश्रूने तुझी पापणी ओली होईल
कुणाचीही जखम हळहळायला लावील
तरच दुःखाचे झरे गाथा गातील
भावा ऊठ आता रस्त्यावर ये
सिद्धार्थ सुद्धा असाच रस्त्यावर आला
चरथ भिक्खवे चारिकं म्हणत बुद्ध झाला
आणि सार्या जगाचे दुःखच कोळून प्याला
अशा जीवनाचे दुःख जर समुत्पाद म्हणतील
... तर या देशातील माणसे कविता होतील
— युवराज गंगाराम
Vijayendra Surwade sir यांच्या वाॅलवरून
Comments
Post a Comment