बुध्दांच्या 'मारविजया'ची शिल्पं.मरातिरेक मभिना...... खूप उपयुक्त माहिती आणि सुंदर शिल्प!

आपण बुध्दांच्या 'मारविजया'ची अनेक शिल्पं बघितलीत.अजिंठा लेणी क्रमांक २६ मधील बुध्द आणि त्यांन मोहविणा-या मार कन्या आणि गिरिमेखलावर आरुढ झालेला देवपुत्र मार ही बघितला आपण.
खालील शिल्प हे माराचा बोधिसत्वावरील हल्ल्याचं आहे.पण यात मारकन्या नाही दाखविल्या. गांधार शैलीतील व कुशाण काळातलं आहे हे शिल्प.

सुजातानं दिलेली खीर खाऊन बोधिसत्व पिंपळाखाली बसलेत ध्यानस्थ.अनेक तर्क,विमर्श सुरु आहेत. कार्य कारणभावाची सांगड घातली जातेय.बोधिसत्व आता बुध्द होणार हे जाणून मार अस्वस्थ होतो. बोधिसत्वाचं बुध्द होणं म्हणजे माराचा पराभवच.तो सर्व सैन्यानिशी बोधिसत्वावर हल्ला चढवतो.होणाऱ्या बुध्दाची पुजा करण्यासाठी जमलेले देव तो हल्ला बघून पळून जातात. देवांचा राजा सक्क हा पाताळात तर ब्रह्मदेव ब्रह्मलोकात धुम ठोकतो.मार मात्र गिरिमेखलावर स्वार होऊन बोधिसत्वाच्या दिशेने निघाला आहे. त्याचं सैन्य ध्यानस्थ बोधिसत्वावर पाषाणव्रुष्टी,अंगारव्रुष्टी,तप्त वाळू व राख फेकतं.नाना प्रकारचे खड्ग व तिक्ष्ण हत्याराने हल्ला होतो.पण बोधिसत्वाची समाधी भंगत नाही. 
         
बाजूला बोधिसत्व कपाळावर तर्जनी ठेवून विचार करतांना दाखवलाय.बोधिसत्वाचं माराशी युद्ध हे स्वतः शीच केलेले महायुद्ध आहे.षड्विकारांचं प्रतिक असलेला मार हा एक शक्तिमान मल्ल आहे.या युध्दात प्रज्ञेच्या साहाय्याने माराचा पुर्ण पराभव करून बोधिसत्वाने बोधी प्राप्त केली. बुध्दत्व प्राप्त केलं.
 
मार युध्दाचा हा प्रसंग सगाथावग्ग,निदानकथा व ललितविस्तारात रंगवून सांगितलाय.अश्वघोषांना पण मारयुध्दाने चांगलच प्रभावित केलेलं दिसतय बुध्दचरितात बोधिसत्वाने प्राप्त केलेलं बुध्दत्व ही एका मानवाने परिश्रमपूर्वक प्राप्त केलेली सर्वोच्च जिवनावस्था आहे.
शिल्पकारांनी, लेखकांनी,चित्रकारानी आपापल्या परीने ही घटना आपल्या प्रतिभेने शिल्पबध्द, चित्रबद्ध, शब्द बध्द करण्याचा प्रयत्न केलेला आपण अजिंठादी लेणी, स्वात खोरं आणि तिबेटी मठांतील भिंतीवर चित्ररुपात केलेला आपण नेहमी बघतो.....  

Mangesh Jawale सर यांची पोस्ट

attackers बुद्धांच्या प्रभावाखाली आल्यासारखे वाटतायत ..❤️

Comments

Popular posts from this blog

निषाद राज एकलव्य

तिब्बत देश का असली नाम " बोद " ( Bod ) है

The world’s 10 most awesome giant Buddhas