देव आहे का?
.
बुध्दांना एका पंडितन विचारल की तथागत आपण लोकांना सांगता देव नाही, आत्मा नाही , स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही.
बुध्द म्हणाले , तुम्हाला आसे कुणी सांगितले की मी आसे बोललो?
पंडित म्हणाला, नाही आसे कुणी सांगितले नाही .
मग मी असे बोललो असे सांगणारी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का ?
पंडीत म्हणाला नाही.
मग असे मी कुणाला सांगताना तुम्ही ऐकले आहे का ?
पंडित म्हणाला नाही. पण तथागत मी लोकांच्या चर्चे तून तसेच ऐकले आहे .तसे नसेल तर तुम्ही काय सांगता ?
तथागत म्हणाले, मी माणसाला वास्तव सत्य स्वीकारायला सांगतो .
पंडित म्हणाला मला सोपे करुन सांगा .
मग तथागत म्हणाले माणसाला पाच बाह्य ज्ञानेंद्रीय आहेत . ज्या द्वारे माणूस सत्य जाणतो
१)डोळे २)कान ३)नाक ४)जीभ आणि ५)त्वचा
माणूस डोळ्यान बघतो,
कानान आवाज ऐकतो,
नाकान वास घेतो,
जीभेन चव घेतो,
आणि त्वचेन स्पर्श जाणतो .
या पंच ज्ञानेंद्रीयान पैकी कधीकधी दोन किंवा तीन ज्ञानेंद्रीयांचा वापर करुन माणूस सत्य जाणतो .
पंडित विचारतो कसे ?
पाणी डोळ्यान दिसत पण ते थंड की गरम हे बघायला त्वचेची मदत घ्यावी लागते .
गोड की खारट कळायला जीभेची मदत घ्यायला लागते .
पंडित म्हणाला बरोबर. पण मग देव असण्याचा आणि नसण्याचा संबंध काय ?
तथागत म्हणाले, तुम्ही हवा पाहू शकता ?
पंडित म्हणाला नाही.
याचा अर्थ हवा नाही असा होतो का ?
पंडित म्हणाला नाही .
हवा दिसत नसली तरी ती आहे .कारण तिच आस्तीत्व नाकारता येत नाही , आपण श्वासोच्छवास करताना हवाच आत-बाहेर सोडतो. वा-याची झुळूक आली की आपल्याला जाणवते. झाड, पान हवेन हलतात ते दिसत.
तथागत म्हणाले, आता मला सांगा देव तुम्हाला पंच ज्ञानेंद्रीयांनी जाणवतो का ?
पंडित म्हणाले नाही .
तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे ?
पंडित- नाही.
तुमच्या आईवडलानी पाहिल्याच सांगितलंय ?
पंडित- नाही.
मग पूर्वजांन पैकी कुणी पाहिल्याच ऐकलत ?
पंडित - नाही.
मग तथागत म्हणाले, आजवर कुणीच पाहिल नाही .
आपल्या कुठल्याच ज्ञानेंद्रीयांनी जे जाणता येत नाही ते सत्य नाही. त्याला गृहीत धरायच नाही. त्याचा उपयोग नाही.
ज्ञानी पंडिताला ब-या पैकी पटायला लागल होत, तरी त्यान प्रश्न विचारला…
तथागत ठिक आहे, पण मग आपण जीवंत आहोत याचा अर्थ आपल्यात आत्मा आहे. हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही ?
तथागत पंडिताला म्हणाले, तुम्ही सांगता आत्मा अमर आहे, तो कधीच मरत नाही .
पंडित म्हणाला, हो. बरोबर आहे.
मग तथागत म्हणाले, मला सांगा माणूस मरतो म्हणजे काय ?
पंडित म्हणाला, आत्मा त्या माणसातून निघून गेला की माणूस मरतो .
मग मला सांगा आत्मा शरीर सोडतो की शरीर आत्मा सोडतो ?
पंडित - आत्मा शरीर सोडतो.
का सोडतो आत्मा शरीर ?
कंटाळा आला म्हणून ?
पंडित- माणसाच आयुष्य संपल्यावर.
तथागत म्हणाले, तस असेल तर सगळी माणस शंभर वर्ष जगली पाहिजे .
अपघात , आजार झाल्यावरही उपचार न करता जगली पाहिजे ,
पंडितजी - तथागत बरोबर आहे तुमच . पण माणसात जीव आहे त्याला काय म्हणाल ?
तथागत म्हणाले तुम्ही पणती पेटवता , त्यात एक भांड , भांड्यात तेल, तेलात वात असते. ही वात पेटवायला अग्नी देता . बरोबर ?
पंडित - बरोबर .
मग मला सांगा वात कधी विझते ?
पंडित -तेल संपत तेंव्हा .
तथागत - आणखी ?
पंडित - तेल आहे पण वात संपते तेंव्हा.
तथागत- आणखी ?
पंडितजी काहीच बोलले नाहीत.
तेंव्हा तथागत म्हणाले पाणी पडले , वारा आला , पणतीच फुटली तर पणती विझु शकते. मानव देह ही एक पणती समजा . आणि जीव म्हणजे आग (उर्जा )
सजीवाचा देह चार तत्वांनी बनलेला आहे .
१) पृथ्वी -घनरुप पदार्थ (माती)
२) आप - द्रवरुप पदार्थ (पाणी , स्नीग्ध तेल )
३) वायु - वारा
४) तेज -उर्जा, उष्णता
या चार पैकी एक पदार्थ वेगळा केला की माणूस मरतो . उर्जा बनण थांबते .
यालाच म्हणतात माणूस मरणे .
आणि
सजीव माणूस मेल्या नंतरचा जो आत्मा आहे, तुम्ही म्हणता तो देवा सारखाच अस्तीत्वहीन आहे .
देव आहे की नाही, आत्मा आहे की नाही या निरर्थक गोष्टीसाठी धम्म वेळ वाया घालवीत नाही .
धम्म माणूस जन्मल्यापासून मरे पर्यंत माणसान कस जगाव याच मार्गदर्शन करतो.
काय कर्म केल्यावर काय परिणाम होतात ते सांगतो.
धम्म जीवंतपणी स्वर्ग उपभोगण्याची माणसाला संधी उपलब्ध करतो आणि जीवंतपणी याच जन्मात अज्ञानामुळ नरक भोगावा लागू नये म्हणून मार्गदर्शन करतो .
ज्याप्रकारे लोक देव आहेत याचे पुरावे देत आहेत.त्यानुसार नरेंद्र मोदी शाळा/कॉलेज न बांधत मंदिर बांधतआहेत यामध्ये काहीही वावगं मला वाटतं नाही.
देव म्हणजे काय ह्याची व्याख्या केल्या शिवाय या प्रश्नाला आणि उत्तराला काहीही अर्थ नाही!
असो सर्व विचारसरणी ज्या जगात प्रचलित आहेत त्यात एक सगुण, आणि निर्गुण असे दोन भिन्न प्रकारातील देवाचे अस्तित्व असावे असे मानतात!
देव म्हणजे ती शक्ती जी या समस्त विश्वाचे नियंत्रण करते ती मग तिला आत्मा ,परमात्मा, हनुमानजी, श्रीराम, श्रीकृष्ण, किंवा बुद्ध काहीही नाव द्या पण त्याचे अस्तित्व नाकारून कोणताही लाभ नक्कीच नाही!
मला मूल होत नाही म्हणून जाऊन देवी अंबाबाईला नवस केला आणि एक वर्षात मूल झालं! मग मी श्रद्धेनी देवीची पूजा अर्चा इत्यादी करतो! आता ही देवी माझ्या पुरती तरी साक्षात ती अज्ञेय शक्तीच आहे जी या विश्वाचे नियंत्रण करते ती आहे आणि ती तशीही कोणत्याही विज्ञान इत्यादींच्या कक्षेत बसत नाही बसू पण शकत नाही हे तर आज जितके वैज्ञानिक आहेत ते मानतात!
उत्तर बरेच लांब होईल पण तो स्टीफेन हॉकिंग असो किंवा schrodinger असो नाहीतर आइनस्टाइन असो सगळे विज्ञानाच्या पुढे अज्ञात अशी कोणती तरी शक्ती आहे तिचे कार्य आम्हाला समजत नाही पण ती देवी अंबाबाई नाही हनुमानजी नाही (अगदी नक्कीच नाही ) हे कोणत्या आधारावर म्हणतात? सगळा प्रश्न हाच आहे .
समर्थ रामदास स्वामी सतत म्हणतात सगुण राखून निर्गुण निरुपावे!
म्हणजे निर्गुण ब्रह्म जे आहे ज्याला कोणीही वैज्ञानिक किंवा तत्वज्ञ नाकारु शकत नाहो ते आता ते तत्व जर प्रसन्न व्हावे अशी इच्छा असेल तर कोठे जाऊन आणि अशा कोणत्या देवाची किंवा तत्वाची आराधना, प्रयत्न करावे यासाठी श्रीराम, हनुमान,देवी, येशू, बुद्ध इत्यादी कल्पना केल्या आहेत पण सर्व धर्मात तोच अनंत परमेश्वर आहे हे पण मानूनच हे रूप कल्पिले आहे!
श्रीकृष्ण गीतेत सरळ म्हणतात की कनिष्ठ देवता ज्या मानणारे तीच अनंत शक्ती म्हणजे माझा हनुमान असे मानत नाहीत त्यांना तो देव पूर्णपणे समजला नाही!
ही चर्चा अनंत आहे पण इतका वेळ न घालवता हीच चर्चा श्वेताश्वतर उपनिषदात अगदी सुरवातीलाच घेतली आहे .ज्या शक्ती ला इथे आहे हे केवळ तर्काने सिद्ध केले आहे जिला इतर विचारवंत देखी आहे इतके मानतात तिलाच आम्ही विठ्ठल आहे राम आहे असे मानून पूजा केली तर बिघडले कुठे?
वरील उतारे एका पुस्तकातील आहेत तर्क वापरून देवाचे अस्तित्व सिद्ध कसे केले ऋषींनी हे दाखवण्यासाठी दिले आहेत.वेळ आणि इच्छा असेल तरच वाचता येतील।
- ह्या एवढ्या लांब तर्क मालेतून शेवटी तो कोणीतरी आहे एवढे तर सिद्ध होते त्याला जर आम्ही आपल्या सोयींनी काही नाव दिले आणि सर्व सृष्टी त्यानीच व्यापलेली आहे हे पण नक्की आहे तर त्याच सृष्टी तील एक असलेला दगड ज्याला मारुती मंदिरात श्रद्धेनी ठेवला आहे त्यात नेमका तो ज्याने ही समस्त सृष्टी व्यापली आहे तो त्याच देवळाच्या दारात जी पायरी आहे तिच्यात पण आहेच!
- म्हणूनच नामदेव महाराज स्वतःला ती विठ्ठलाच्या देवळाची पायरी मी आहे असे म्हणतात श्रद्धाळू त्याच पायरी ला नमन करून विठ्ठलाचे दर्शन घेतात!
- माझा विठ्ठल, किंवा पायरी हे सगळे देवच आहेत आणि गाय बकरी कुत्रा पण देवच आहेत
- वासुदेव सर्वम
श्रीराम।
Comments
Post a Comment