Skip to main content

मुद्‌गल पुराण


विकिपीडिया

जे जगात नाही ते वेदांत आहे असे म्हणतात. वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ.'मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्' अशी वेदाची व्याख्या करता येईल. जगातील पहिले साहित्य वेद. वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद यांना वेद अथवा संहिता असे म्हटले जाते.या वेदांचे संहिताआरण्यकेब्राह्मणे आणि उपनिषदे असे चार उपविभाग आहेत. यापैकी उपनिषदे ही वेदांच्या शेवटी येतात म्हणून त्यांना 'वेदान्त' असे म्हटले जाते. वेद बंगल्यावर आधारलेले संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली वेदांमधील काही सुप्त हे स्त्रियांनी रचलेल्या आहेत वैदिक मारण्याची भाषा संस्कृत ही होती वैदिक लागणे अत्यंत समृद्ध आहे ऋग्वेदात यातील मूळ ग्रंथ मानला जातो तो काव्यरूप आहे ऋग्वेदा सह यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात विविध म्हणजे जाणणे त्यापासून वेध ही संज्ञा तयार झाली त्याचा अर्थ ज्ञान असा होतो मौखिक पटना च्या आधारे वेदांचे जतन केले गेले वेदांना श्रुती असे म्हणतात पुरुषांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सुप्त असे म्हणतात ऋग्वेद संहितेमध्ये विविध देवतांची स्तुती करणारी सूक्त आहेत यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत यज्ञविधी मध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेमध्ये केलेले आहे त्यात असणारी मंत्र आणि गद्यात दिलेले त्याचे स्पष्टीकरण अशी या समितीची रचना आहे तर सांग वेदांमध्ये यज्ञ विधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जात असे ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन यामुळेच संहितेमध्ये केलेला आहे भारतीय संहितेच्या निर्मितीमध्ये सामवेद याचा मोठा वाटा आहे तर अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले अथर्व वेदांमध्ये दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते आयुष्यात येणाऱ्या संकटावर दुःखांवर कशा पद्धतीने उपाय करायचे हे त्यामध्ये सांगितले आहेत तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात दिलेली आहे राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यामध्ये केलेले आहे त्यांच्या नंतर ब्राह्मणग्रंथ उपनिषदे याची रचना केली गेली त्यांचाही समावेश यामध्ये केला जातो यज्ञविधी मध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण्य ग्रंथ म्हणतात प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मणग्रंथ आहेत तर आरण्यक यहे अरण्यात जाऊन एकाग्रचित्ताने केलेली चिंतन अरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे यज्ञ विधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी घेतलेली दिसते तर उपनिषद म्हणजे गुरूजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय जन्म-मृत्यू सारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे चार वेद ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे पंधराशे वर्षांचा कालावधी लागला त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वांग्मय हे महत्त्वाचे साधन आहे

शब्दोत्पत्तीसंपादन करा

वेद हा संस्कृत शब्द असून तो 'विद्' या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. वेद या शब्दाचा अर्थ 'ज्ञान' असा सुद्धा घेतला जातो. वेदभक्तांच्या दृष्टीने हे ज्ञान पवित्र आणि दैवी ज्ञान आहे. परंतु मूळ रूपामध्ये हा शब्द साहित्य ग्रंथामध्ये एक विशाल राशी-विशेषाचा बोधक आहे. प्राचीन काळी ऋषींना वेद 'दिसले' म्हणून त्यांना वेद असे नाव मिळाले आहे. सत्, चित् आणि आनंद असे ब्रह्माचे स्वरूप असल्याचे वेदांमध्ये म्हटले आहे; म्हणून वेदाला "ब्रह्म" असेही म्हणतात. जो ग्रंथ इप्सित फलाची प्राप्ती आणि अनिष्ट गोष्ट दूर करण्याचा मानवी बुद्धीला अगम्य असा उपाय दाखवून देतो त्याला वेद असे म्हणावे.

वेदांचा आविष्कारसंपादन करा

वेद असे निर्माण झाले याविषयी अनेक मते आढळून येतात.परमात्मा किंवा ईश्वर या म्हाभूताचे नि:श्वास म्हणजे वेद होत असे बृहदआरण्यक उपनिषदात सांगितले आहे.वेद हे शब्दस्वरूप असल्याने ते आकाशातून उत्पन्न झाले असेही एक मत आहे.वेद आपला धर्म आहे...

वेदांचे महत्त्व व प्रामाण्यसंपादन करा

वेद हे आर्यधर्माच्या मूलस्थानी आहेत. 'वेदोऽखिलो धर्ममूलम् |' असे मनुवचन प्रसिद्धच आहे. वेदांवरून तत्कालीन आर्य जनांच्या भौतिक उन्नतीची कल्पना येते. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या तीन गोष्टींच्या माध्यमातून आर्यांनी भौतिक उत्कर्ष साधला होता. वेद, स्मृती, सदाचार आणि स्वतःच्या अंतःकरणास जे बरे वाटेल ते, अशी धर्माची चार प्रकारची लक्षणे आहेत. भारतीय आस्तिक दर्शनानी आपापले तत्त्वज्ञान मांडताना वेदांचा आधार घेतला आहे.

वेदांचा कालनिर्णयसंपादन करा

ख्रिस्ती शतकापूर्वी १००० वर्षांच्या पलीकडच्या काळात वेदरूप काव्ये रचली असावी असे दिसते. काही विद्वानांचे असे मत आहे की छंदांचा काल ख्रिस्ती शकापूर्वी दोन किंवा तीन हजार वर्षापूर्वीचा असावा. लोकमान्य टिळकांनी 'ओरायन'हा ग्रंथ लिहून वेदकाळासंबंधी आपले मत सविस्तरपणे मांडले आहे. वेदकालाचा निर्णय करण्यासाठी वेद वाक्यांचाच आधार घेतला पाहिजे असे त्यांनी नोंदविले आहे. डॉ.भांडारकर ऋग्वेदाचा काल सनपूर्व २५०० मानतात तर अविनाशचंद्र दास यांच्या मते तो सनपूर्व २५००० इतका मागे जातो.[१]

वेदांचे रक्षण व अध्ययनसंपादन करा

व्यासांनी वेदांचे प्रवर्तन केले व त्यांच्या शिष्यांनी वेदांचे ग्रहण करून त्यांची परंपरा पुढे चालू ठेवली.हे सर्व शिष्य ज्ञानोपासक होते. वेदांचे अध्ययन करणे, त्यांचे अध्यापन करणे व वेदांचे संरक्षण करणे हे त्यांचे जीवित कार्य होते. मूळच्या वेदमंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ नये यासाठी प्राचीन ऋषींनी अनेक कॢप्त्या योजल्या आहेत. हे वेदमंत्र सस्वर असे टिकावेत यासाठी आणखी एक युक्ती प्राचीन आर्यांनी योजिली आणि ती म्हणजे वेदांच्या विकृती तयार करणे ही होय.

वेदांचे स्वरूपसंपादन करा

वेदांमध्ये अग्नी, इंद्र, वरूण, उषा,मरुत अशा विविध देवतांची स्तुतीपर सूक्ते आहेत. वैदिक ऋषींनी निसर्गातील वेगवेगळ्या शक्तींना उद्देशून रचलेली ही स्तोत्रेच आहेत. वैदिक काळातील कुटुंब व्यवस्था, लोकजीवन, संस्कृती, आश्रम व्यवस्था, शिक्षण पद्धती ,राष्ट्र दर्शन ,तत्त्वज्ञान विषयक संकल्पना अशा विविध मुद्द्यांची माहिती आपल्याला वेदांमध्ये अभ्यासायला मिळते.[२]

आधुनिक काळातही अभ्यासाची गरजसंपादन करा

खऱ्या अर्थाने वेदांचे रक्षण करायचे असेल तर वेदांतील ऋचांचा चा उच्चार योग्य माणसाने, योग्य वेळी व योग्य परिस्थितीत केल्याने त्यातील खरा अर्थ प्रकट होतो, असे सांगितले जाते. गुरु शिष्य परंपरेने चालत आलेले हे ज्ञान आजवर सांभाळले गेले आहे.


वेदांशी निगडित असे -

वेदांविषयी मराठी पुस्तकेसंपादन करा


  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा

वेदांग

विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.

वेद वाङ्मय हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणता येईल. ऋग्वेदयजुर्वेदसामवेदअथर्ववेद या वेदांना व्यक्ती मानून सहा उपयुक्त शास्त्रे ही त्या व्यक्तीची अंगे म्हणजेच अवयव आहेत अशी कल्पना केली आहे. हीच सहा शास्त्रे म्हणजे वेदांगे होत.

वेदांग :

छन्दः पादौ तु वेदस्य हस्तौ कल्पो Sथ पठ्यते | ज्योतिषामयनं चक्षुर्निरूक्त श्रोत्रमुच्यते|

शिघ्रा घ्राण तु वेदस्य मुखं व्याकरणं स्मृतम | तस्मात साङ्गमधीत्यैव ब्रह्मलोके महीयते |

छंदशास्त्र, कल्पसूत्रे,ज्योतिष, निरुक्त, शिक्षा आणि व्याकरण ही सहा शास्त्रे वेदवाङ्मयाचे अनुक्रमे पाय, हात, डोळे, कान, नाक आणि मुख आहे अशी कल्पना केली आहे. वेदांगांची निर्मिती ही वेदाध्ययनाला पूरक अभ्यास म्हणून झाली. मात्र त्यांचा वैदिकोत्तर काळातील शास्त्रे, कला,संस्कृती,साहित्य यांवर फार मोठा प्रभाव पडला.

१) शिक्षा:

शिक्षा म्हणजे उच्चारणशास्त्र! यज्ञकर्म करताना वेदांतील मंत्रांचे उच्चारण करावे लागते. त्यासाठी मंत्र कसे म्हणावेत, या मंत्रांमध्ये कोणकोणते वर्ण वापरले आहेत, तो वर्ण कसा उच्चारायचा इत्यादी प्रश्नांची उत्तरे शिक्षा शास्त्रामध्ये मिळतात.

शिक्षा या वेदांगाचे मूळ आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडते. याशिवाय तैत्तिरीय उपनिषदामध्ये शिक्षा या वेदांगाची व्याख्या दिलेली आहे –

ॐ शीक्षां व्याख्यास्यामः ।

वर्णः स्वरः । मात्रा बलम् ।

साम सन्तानः । इत्युक्तः शिक्षाध्यायः ॥ १ ॥

म्हणजेच स्वर-व्यंजनांची संख्या, स्वरांचे संतुलन आणि परस्परसंबंध यांचा अभ्यास म्हणजे शिक्षा होय.

२) कल्पसूत्रे:

श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, शुल्बसूत्रे आणि धर्मसूत्रे अशा चार प्रकारच्या ग्रंथांना कल्पसूत्रे असे म्हणतात. श्रुतींनी म्हणजेच वेदांनी सांगितलेले यज्ञ कसे करावेत हे सांगणाऱ्या ग्रंथांना श्रौतसूत्रे असे म्हणतात. अग्निष्टोम, अश्वमेध, वाजपेय इ. यज्ञांचे वर्णन यामध्ये येते. दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे यज्ञ सांगणाऱ्या ग्रंथांना गृह्यसूत्रे असे म्हणतात. मनुष्य जन्माला आल्यापासून त्याच्या मृत्यू पर्यत करण्यात येणारे संस्कार, नवीन घर बांधतानाचा विधी, काही प्रकारच्या शांती इत्यादी वर्णन गृह्यसूत्रांमध्ये येते. यज्ञवेदी, अग्निकुंडे आणि यज्ञशाळा बांधताना मोजमापासाठी दोरी आवश्यक असते. या दोरीला शुल्ब असे म्हणतात. वेदी कशी बांधावी? अग्निकुंडाचे मोजमाप काय असावे ? इ. माहिती शुल्बसूत्रांमध्ये येते. तर मनुष्याने समाजात वागताना कोणते नियम पाळावेत या संबंधीचे विवेचन करणाऱ्या ग्रंथांना धर्मसूत्रे म्हणतात. एकंदर, यज्ञातील शारीरिक क्रिया आणि समाजातील आदर्श वर्तन यांचा उहापोह कल्पसूत्रांमध्ये आढळतो.

३) निरुक्त:

वैदिक मंत्रांचा अर्थ समजण्यासाठी निरुक्ताचा उपयोग होतो. निरुक्त म्हणजे शब्दाची व्युत्पत्ती. वैदिक शब्दांचा अर्थ दुर्बोध होऊ लागल्यावर एक समानार्थी शब्दांचा कोश तयार करण्यात आला होता त्याला निघण्टु असे म्हणत. याच निघण्टु वर यास्काचार्यांनी निरुक्त ही टीका लिहिली. यामध्ये शब्दांच्या व्युत्पत्ती दिलेल्या आहेत. यास्कांनी व्युत्पत्ती देताना काही भाषाशास्त्रीय सिद्धांत सांगितलेले आहेत. यास्काचार्यांच्या निरुक्त ग्रंथांवर आज तीन टीका उपलब्ध आहेत. त्यापैकी एक दुर्गासिंह, दुसरी स्कंद-महेश्वर आणि तिसरी टीका नीळकंठ यांनी लिहिलेली आहे.

४) व्याकरण:

वैदिक मंत्रांचे अर्थ समजण्यासाठी निरुक्ताच्या जोडीला व्याकरणाचीही आवश्यकता असते. व्याकरणामुळे शब्दाची नेमकी जात आणि रूप ओळखता येते. पाणिनी ऋषींनी लिहिलेला अष्टाध्यायी हा ग्रंथ व्याकरणावरील सर्वोत्कृष्ट ग्रंथ समजला जातो. पाणिनीपूर्व काळातही अनेक व्याकरणकार होऊन गेले. शाकटायन, गार्ग्य, आत्रेय, शाकल्य हे त्यापैकी काही होय. पाणिनीच्या व्याकरणावर पतंजलींनी महाभाष्य नावाचा टीकाग्रंथ लिहिला आहे.

५) छन्दःशास्त्र:

वैदिक पद्यमंत्र विशिष्ट छंदांमध्ये रचलेले होते. यज्ञात ते त्या छंदात म्हटले जात. छंदाची शास्त्रीय माहिती छन्दःशास्त्र या ग्रंथात दिलेली आहे. सध्या उपलब्ध असलेले छन्दःशास्त्र पिंगलाचार्यांनी रचलेले आहे. संस्कृत भाषेमध्ये ७ प्रमुख छंद सांगितले आहेत.

गायत्रेण प्रति मिमीते अर्कमर्केण साम त्रैष्टुभेन वाकम् ।

वाकेन वाकं द्विपदा चतुष्पदाक्षरेण मिमते सप्त वाणीः ॥२४॥

गायत्री, अनुष्टुप्, त्रिष्टुभ, जगती,उश्निह, बृहति,पङ्क्ती हे ते सात छंद आहेत.

६) ज्योतिष:

ज्योतिः म्हणजे चमकणारे, प्रकाशणारे म्हणजेच आकाशातले ग्रहगोल. त्यांचे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र ! कोणताही विधी करण्यासाठी योग्य वेळ, योग्य ऋतू कोणता हे ज्योतिषशास्त्र सांगते. लगधाचा वेदाङ्गज्योतिष हा या शास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या दोन संस्करणे आहेत. त्यापैकी एक संस्करण ऋग्वेदाशी तर दुसरे संस्करण यजुर्वेदाशी निगडित आहे.[१]

  1. ^ संस्कृत वैजयंती – इयत्ता बारावी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,२०१३.

टीप: हा लेख ध्रुव नॉलेज वेलफेअर सोसायटी, डोंबिवलीया संस्थेच्या 'ज्ञानबोली ' या उपक्रमांतर्गत रिद्धी करकरेयांनी लिहिला आहे.


Disambig-dark.svg


Broom icon.svgया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनासमदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चाचर्चापानावर पहावी. 



कल्प हे वेदांमधील म्हणजेच संहितांमधील विविध संकल्पना समजावून सांगण्यासाठी रचले गेलेले सूत्रग्रंथां होय. शिक्षा, कल्प.व्याकरण,निरुक्त,छन्द आणि ज्योतिष अशी शा वेदांगे आहेत. त्यातील कल्प हे दुसरे वेदांग आहे.कल्पो वेद विहितानां कर्मणामानुपूर्व्येण कल्पना शास्त्रम | कल्प म्हणजे वेदविहित कर्माची क्रमबद्ध मांडणी किंवा शास्त्र होय.[१]

हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


सद्यस्थितीत ४० कल्पसूत्रे उबलब्ध असून १४ श्रौतयज्ञ,७ गृहयज्ञ, ५ महायज्ञ व १६ संस्कार अहा एकून ४२ कर्माबद्दलचे प्रतिपादन आहे.

आशयसंपादन करा

यज्ञप्रयोगांची सुव्यवस्थित मांडणी करण्याच्या हेतूने वैदिक आचार्यांनी ब्राह्मण ग्रंथातील उपयुक्त असा भाग घेवून कल्पसूत्रे तयार केली.कर्मकांडविषयक सर्व विधि-नियम कल्पसूत्रे सांगतात.वैदिक धर्मातील सर्व कर्म,सर्व संस्कार,अनुष्ठाने,प्राचीन हिंदूंच्या जीवनाची नित्य -नैमित्तेक कर्मे,धार्मिक क्रिया,संस्कृती या सर्वांचा मूळ आधार कल्पसूत्रात सापडतो.कमीत कमी शब्दांमध्ये अधिकाधिक भाव व्यक्त करणे हे सूत्रांचे वैशिष्ट्य आहे.संक्षिप्तपणामुळे वेदोक्त विधी पाठ करणे सोपे जाते.[२]

विभागसंपादन करा

  • श्रौतसूत्रे - यांत विविध यज्ञांची माहिती या ग्रंथात सूत्ररूपात दिलेली आहे. वैदिक हवि,तसेच सोमयज्ञासंबंधी धार्मिक अनुष्ठाने यांचे प्रतिपादन करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. आश्वलायन,शांखायन,मानव,बौधायन,आपस्तम्ब,हिरण्यकेशी,कात्यायन,लाट्यायन,द्राह्यायण,जैमेनीय,वैतान ही मुख्य श्रौतसूत्रे आहेत.
  • गृह्यसूत्रे - गृहस्थाने करावयाच्या विविध आचारांची माहिती या सूत्रग्रंथात आहे.आश्वलायन,शांखायन,मानव,बौधायन,आपस्तम्ब,हिरण्यकेशी,भारद्वाज,कात्यायन,द्राह्यायण,गोभिल,खदिर,कौशिक ही मुख्य गृह्यसूत्रे आहेत
  • धर्मसूत्रे - आचरणाचे विविध नियम आणि धर्मकृत्यांची माहिती यामध्ये दिएलेली आहे.सामाजिक रीतिरिवाज,प्रथा यांच्या अनुषंगाने समाजातील घटकांच्या परस्परांशी आलेल्या संबंधावर ही सूत्रे भाष्य करतात.वसिष्ठ,मानव,बौधायन,आपस्तम्ब,गौतम ही मुख्य धर्मसूत्रे होत.
    [३]

संदर्भसंपादन करा

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा
  2. ^ डॉ.पांडे सुरुचि,संस्कृत साहित्याचा इतिहास भाग १,ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन
  3. ^ डॉ.पांडे सुरुचि,संस्कृत साहित्याचा इतिहास भाग १,ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन

Comments

Popular posts from this blog

निषाद राज एकलव्य

तिब्बत देश का असली नाम " बोद " ( Bod ) है

The world’s 10 most awesome giant Buddhas