आधुनिक मानवजात ही आफ्रिका खंडातील एक पुरुष आणि एक स्त्री यांचे वंशज आहेत. म्हणजे मानववंश हा आफ्रिकेत सुरू झाला आणि वाढला.
पहिली गोष्ट म्हणजे मानववंश शास्त्रज्ञांनी हे मान्य केले आहे, की ‘आर्य’ नावाचा कोणताही वंश कधीही अस्तित्वात नव्हता. त्यामुळे आर्य भारतात येण्यापूर्वी येथील मूळ रहिवासी कोण होते, हा प्रश्नच चुकीचा आहे.
दुसरे म्हणजे पुरामानववंश शास्त्रज्ञांच्या दीर्घकालीन संशोधनावरून आणि मानवी जनुकांच्या विश्लेषणाच्या आधारे शास्त्रज्ञ आता आशा निष्कर्षाला पोचले आहेत की, शरीरशास्त्राच्या दृष्टीने सर्व आधुनिक मानवजात ही आफ्रिका खंडातील एक पुरुष आणि एक स्त्री यांचे वंशज आहेत. म्हणजे मानववंश हा आफ्रिकेत सुरू झाला आणि वाढला. नंतर काही कारणाने आफ्रिकेतील माणसांचे काही गट तेथून बाहेर पडले आणि वेगवेगळ्या दिशांना पसरले. (Ref: ‘Before the Dawn' by Nicholas Wade) त्यातील काही गट महाराष्ट्रासह भारतात आले.
त्यामुळे आजच्या महाराष्ट्रातील आधुनिक मानव समाजाचे मूळ स्थान आफ्रिका असून कोणीही येथील मूलनिवासी नाही. सर्व लोक बाहेरून आले. फरक इतकाच आहे की, काही आधी आले आणि काही नंतर आले..
Comments
Post a Comment