शुद्र शब्द ऋग्वेदात एकाच ठिकाणी आढळतो. त्यातही प्रक्षिप्त मानल्या गेलेल्या पुरुषासुक्ताच्या भागात.
डॉ. आंबेडकरांनी शुद्र हा सुरुवातीपासून चौथा वर्ण नव्हता व शुद्र हे क्षत्रिय वर्ण चे होते हे साधार स्पष्ट केले आहे.
शुद्र हा शब्द एका जमातीचे किंवा टोळीचे विशेषनाम म्हणून वापरलेले आहे. सिकांदराबरोबर ज्या टोळीने युद्ध केले त्यात जी सोदरी नावाची टोळी होती. तीच शुद्र टोळी असा लॅसेन या ग्रंथकाराने हवाला दिलेला आहे.
विष्णू पुराण, मार्कंडेय पुराण, आणि ब्राह्म पुराण यात शुद्रांची टोळी अनेक टोळ्यांपैकी एक स्वतंत्र टोळी असून विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेशात ती राहत असे.महाभारतातील सभापर्व ३२ व्या अध्यायात शुद्रांची प्रजासत्ताक राज्ये आढळतात
( शुद्र पूर्वी कोण होते ?)
या शुद्र टोळीत पुरातन काळी पैजवन नावाचा राजा होऊन गेला असल्याचा उल्लेख महाभारतात आलेला असून ऋग्वेदातील सुदास हाच पैजवन राजा होय हे डॉ.आंबेडकरांनी व प्रो. वेबर यांनी मांडलेलं आहे.
सुदासाचा संबंध पुरु गटाशी असून त्याची वंशावळी आपल्याला विष्णू पुराणात पाहायला मिळते.
पुरु टोळी हि आर्य होती. याबद्दल संशय नाही. पण कोसंबी व शरद पाटील यांसारखे विद्वान सुदासाला दास समजतात. जर सुदास दास असेल तर त्याला अनार्य मानावे लागेल. परंतु त्याची जी वर्णने वेदात येतात त्यानुसार तरी तो आर्य ठरतो.
तो आर्य कि अनार्य हे ठरवण्याआगोदर काही मुद्द्यांचा आपण विचार करूया.
शुद्र या शब्दाचा अर्थ आपण आधी समजून घेतला पाहिजे. शुद्र या शब्दाचा मूळ अर्थ होतो शुचदा: म्हणजे पवित्र केलेला किंवा पवित्र करून घेतलेला असा आहे.
सुदासाचे वडील दिवोदास याला पुरु टोळीच्या बध्रयाश्वाने दत्तक घेतल्याचे वर्णन ऋग्वेदात (९-६१-२) आलेले आहे. त्यामुळेच शुद्र हा शब्द दिवोदास व सुदासाच्या वंशजाना लावला गेला.
शुद्र व अभिर (अहिर) हे एकच लोक होत असा अभिप्राय पतंजली याने दिला आहे. त्यामुळे शुद्र हे सुदासाच्या वंशातील असून मूळचे नाग गणाचे लोक होते.
नागांना व्रात्यस्तोम यज्ञाद्वारे पवित्र करून आर्य करण्यात येत असे. असेच व्रात्यस्तोम यज्ञाने पवित्र करून बाध्रयाश्वने दिवोदासाला दत्तक घेतले होते. त्याच्याच पुढील पिढया शुद्र नावाने ओळखल्या गेल्या.
पुढील काळात शुद्रांचे जे प्रकार शास्त्रकारांनी केलेले आहेत. ते म्हणजे निरवासीत शुद्र व अनिर्वासित शुद्र. आर्य धर्माच्या कक्षेत आलेले शुद्र व आर्य धर्माच्या कक्षेत नसलेले शुद्र.
शूद्रांना सुरुवातीच्या काळात तरी इतर आर्याप्रमाणे सर्व अधिकार होते. म्हणूनच तर सुदास हा वेदातील सर्वात मोठा राजा म्हणून आपणास पाहायला मिळतो.
शुद्रांची अधोगती हि ब्राह्मण आणि शुद्र संघर्षांपासून सुरु होते. याची सुरुवात वासिष्ठाने केली असल्याचे दाखले वैदिक वाङ्मयात आहे.
ऐतरेय ब्राह्मण या ग्रंथात श्यापर्ण ब्राह्मणाची जी कथा आली आहे. त्या कथेत पुरातन काळच्या चार उदाहरणांपैकी एक उदाहरण वसिष्ठ आणि सुदासाचे आहे. त्यात खोट्या कथा सांगून वासिष्ठाने सुदासाला यज्ञात सोमाऐवजी वडाच्या पारंब्याचा रस पाजला होता हे मान्य केले आहे. यज्ञात सोम हे पेय फार पवित्र मानलेलं असून त्यापासून राजा सुदासाला अलिप्त ठेवणं हा खरंतर सुदासाचा अपमानच होता. आणि इथूनच वसिष्ठ व सुदासाचा संघर्ष होतो. सुदास वसिष्ठाला पुरोहित पदावरून हटवतो व विश्वामित्राला पुरोहित म्हणून स्थानापन्न करतो. पुढे हा संघर्ष पिढ्यानपिढया चालताना आपणाला दिसतो.
हा संघर्ष ब्राह्मण व क्षत्रियातील शुद्र यांमधील संघर्ष होता. इतर क्षत्रियांनी या संघर्षात न उतरण्याचे कारण दिवोदास हा दत्तक पुत्र होता व मूळचा नाग गणांचा होता. त्यामुळेच ब्राह्मण शुद्र संघर्षात शुद्र एकाकी पडले व डॉ. आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे ते उपनयन अधिकाराला पारखे होऊन अधोगतीला गेले. ब्राह्मणांनी त्यांच्यासाठी अनेक जुलमी कायदे लादले व सुदासाच्या शूर अश्या वंशाना देशोधडीला लावले.
आर्य हे भारताबाहेरून येथे आले हे आपण पाहिलंच. पण याचा अर्थ दास (अनार्य) हे मुलानिवासीवादी ठरतात असा होत नाही. नाग सुद्धा भारताबाहेरून आले असण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. यात फरक फक्त हा आहे कि नाग हे आर्यांच्या अगोदर भारतात आले असावेत.
कोसंबी दासांबद्दल म्हणतात :- दास हे सुमेरियनांपैकी असणेहि संभवनीय आहे. युफ्रेतीस आणि तैग्रीस नद्यांच्या मुखाजवळ सुमेरियन लोकांनी वसाहती केल्यानंतर काही काळाने त्यांच्यातीलच ह्या दास लोकांनी सप्तसिंधु देशात वसाहती केल्या असाव्यात (हिंदी संस्कृती आणि अहिंसा, p.11)
आर्यांत फार पूर्वीपासूनच यज्ञ संस्था होती असे वाटत नाही. वेदांचे तीन विभाग पडतात. एक प्रार्थना विभाग , दुसरा गान विभाग व तिसरा यज्ञ विभाग. ऋग्वेद आणि अथर्ववेद प्रार्थना विभाग, सामवेद गान विभाग आणि यजुर्वेद हा यज्ञाशी संबंधित आहे. जेव्हा यज्ञ संस्था निर्माण झाली तेव्हा या प्रार्थना यज्ञातील मंत्र बनले.
डॉ. आ.ह.साळुंखे म्हणतात त्रिवेदांचे मंत्र हे मुळचे देवतांच्या प्रार्थना या स्वरूपात रचले गेले. नंतर ते यज्ञकर्माशी कृत्रिमरित्या जोडण्यात आले. (आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल, p. 72)
विठ्ठलावर आज पर्यंत अनेकांनी पुस्तक व लेख लिहिले. सर्वानी आपआपल्या परीने विठ्ठलाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला.
आजही त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न संपलेला नाही. काही यशस्वी हि झाली असतील. आणि काही अपयशीही. तरी प्रत्येकाची काही ना काही मत आहेत. त्यांचा आधार घेत मी माझी मतं तयार केलेली आहेत. अर्थात सध्याच्या घडीला ती मी माझ्या पुरता अंतिम मानत असलो तरी नवीन माहिती समोर आल्यावर ती मी बदलूही शकतो.
रा.ची. ढेरे 'विठ्ठल : एक महासमन्वय' या पुस्तकात म्हणतात:- "विठ्ठल या नावाचा स्पष्ट उलगडा अजून व्हायचा आहे. आणि कदाचित त्या उलगड्यातूनच विठ्ठलाच्या मुलरूपाचा शोध लागण्याचा संभव आहे......त्या आदिरूपाचा शोध घेण्यासाठी विठ्ठल नावाची निःशंक व्युत्पत्ती सापडायला हवी"
ह्याच विठ्ठल नामाच्या व्युत्पत्तीच्या शोधासाठी हा लेख मी लिहिलेला आहे.
महाराष्ट्राचं एकमेव प्रसिद्ध लोकदैवत म्हणजे विठ्ठल.
विठ्ठलाला विठू, विठोबा, पांडुरंग, पंढरीनाथ या नावाने देखील ओळखलं जातं.
विठ्ठलाच्या नावाची व्युत्पत्ती काही मान्यवरांनी सांगितलेली आहे ती पुढील प्रमाणे :-
जानिए,आखिर श्रीकृष्ण ने क्यों किया था एकलव्य का वध? एकलव्य ने अपना अंगूठा काटकर गुरु द्रोण को अर्पित कर दिया। इसके बाद वे अपने पिता हिरण्यधनु के पास गया। एकलव्य ने अपने सधानपूर्ण कौशल से धनुर्विद्या में पुनः दक्षता प्राप्त कर ली। जनसत्ता ऑनलाइन नई दिल्ली | Published on: March 26, 2019 1:04 pm {"uid":0.12982547204340023,"hostPeerName":"https://www-jansatta-com.cdn.ampproject.org","initialGeometry":"{\"windowCoords_t\":0,\"windowCoords_r\":360,\"windowCoords_b\":686,\"windowCoords_l\":0,\"frameCoords_t\":2353,\"frameCoords_r\":330,\"frameCoords_b\":2403,\"frameCoords_l\":10,\"posCoords_t\":974,\"posCoords_b\":1024,\"posCoords_r\":330,\"posCoords_l\":10,\"styleZIndex\":\"\",\"allowedExpansion_r\":40,\"allowedExpansion_b\":636,\"allowedExpansion_t\":0,\"allowedExpansion_...
तिब्बत देश का असली नाम " बोद " ( Bod ) है। आज भी तिब्बती लोग अपनी मातृभूमि को " बोद " ही कहते हैं। " बोद " दरअसल " बुद्ध " का परिवर्तित रूप है। " बोद " का एक परिवर्तित रूप " भोट " है। इसीलिए तिब्बती भाषा को " भोटी / भोटिया " कहते हैं। भोट ( बोद ) लोग भूटान में भी रहते हैं। इसीलिए वह भूटान है। कनिष्क ने बुद्ध को " बोदो " ( Boddo ) लिखा। तिब्बत वालों ने " बोद " ( Bod ) लिखा। तिब्बत और भूटान दोनों बौद्ध देश हैं और दोनों देशों के नाम बुद्ध के नाम पर पड़ा है। बुद्ध के व्यक्तित्व में वो जादू था कि कई देशों ने अपना नाम बुद्ध के नाम पर रख लिए। कहाँ थे और कहाँ आ गए!!! बुद्ध के व्यक्तित्व में वो जादू था कि कई देशों ने अपना नाम बुद्ध के नाम पर रख लिए। कहाँ थे और कहाँ आ गए। तिब्बत नाम चीन द्वारा आरोपित है। Rajendra Prasad Singh सर जी तिब्बती भाषा को ब्योद् कहा जाता है द जो आधा रहता है उसका उच्चारण ना के बराबर होता है बुद्ध = बोद = ब्योद् = भोट = भोटिया। भोट/ भोटिया वास्तव में " बुद्ध " क...
Peter Moore | 17 October 2018 The world’s 10 most awesome giant Buddhas Immense in both scale and beauty, these paeans to the Buddhist faith make quite the impression, whether you’re a believer or not 1. The Great Buddhas of Monywa, Myanmar The Great Buddhas of Monywa (Dreamstime) Visitors to Monywa, 138 kilometres northwest of Mandalay, will be treated to not one, but two giant Buddhas – one standing, one lying down. At 90 metres long, the one lying down is the largest reclining Buddha in the world. It houses a collection of 9,000 etchings illustrating Buddha’s life that can be viewed by entering through a door in the statue’s backside. The standing Buddha directly behind is 116 metres tall and is known as Laykyun Setkyar. 2. Buddha Dordenma Statue, Thimphu, Bhutan Buddha Dordenma, Bhutan (Dreamstime) Made of bronze and gilded with gold, the Buddha Dordenma sits atop a hill in Kuenselphodrang Nature Park, overlooking the Southern entrance to Thimphu Valley in Bhutan. It was built...
Comments