बघा पटतंय का?

कसंय ना मानसाला पटाऊ उत्तर दिले ना की माझे अनुयायी, फॉलोवर्स, भक्तगण (अंधभक्त) ( ज्यांला मित्र, गणगोत, समाज) जवळ येतातच.स्तूती कोणाला बरं आवडत नाही.

एक लक्षात घ्या माझे उत्तर तुमच्या शास्त्राला अनुसरून जरी नसले ना, तरी जगातल्या कोणत्याच शस्त्रापुढे कधीच नतमस्तक होणार नाही. म्हणजे नाहीच.

मुळात सरसकट विचारवंतांना धर्म आणि धर्मोपासक काय हेच अजून पावेतो तरी कळलेच नाही.कोणत्यातरी दळभद्रया मुर्खाने जात तयार केली आणि समाजात आणि काळजाकाळजात भेद निर्माण केले.

आपण सारे एकच आहोत. सांगणाऱ्यांच्या, जाणिव करुन देणाऱ्यांच्या राजरोसपण याच भेदाच्या जीवावर केलेल्या कत्तली जीरवायला सोप्पे जाते. पण जाता जात नाही ती म्हणजे जात.

भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते

वाणीत भीम आहे करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते

गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खर्‍याचे दुसरेच टोक असते

तत्त्वाची जाण असती बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते

सदभाव एकतेचे जर अंतरात असते
चुकले कुणीही नसते सारेच एक असते

वामन समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझीया कृतिप्रमाणे सारेच नेक असते...

- वामनदादा कर्डक

या लोकशाहीर , विद्रोही माणसाने वरीलपंक्ती निर्माण केले. समजा हे वामनदादा जगातल्या प्रथम विचार अभिव्यक्त करणाऱ्यांचा मुलाधार आहे. ( थोडक्यात तुमच्या भाषेत व्यास,वाल्मिकी आहे असं समजा) त्यांचे हे गीत कविता पवित्र श्लोक मानू. काव्य मानू. आता वामनदादांनी भीमराव आंबेडकर यांच्या सबंध जीवनावर महाकाव्य निर्माण केले. समजा ते भीमायन या नावानेच लिहीले.

मुळात(पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील लेखक व प्राध्यापक प्र.शं. जोशी यांनी डॉ. आंबेडकर यांच्यावर संस्कृत श्लोकांच्या स्वरुपात भीमायन हे वयाच्या ८४ व्या वर्षी हे चरित्र काव्य लिहिले आहे.) हे बऱ्याच जणांना माहिती नाही. हे ज्यांना माहिती आहे. त्यांना राक्षस म्हणूया . म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या विचारांचा भेदाच्या ( वेद) जीवावर त्यांचा स्विकार अथवा तिरस्कार ठरवला जाईल.

इथे मी समजा म्हणलंय लगेच पुढच ऐकून न घेता माझ्याबद्दल चुकीचा समज करून घेऊन तसा समज पसरवू नका. कारण जसा समज तसाच समाज घडत वा बिछडत असतो असे माझे म्हणजेच तुमच्या सुमितचे स्पष्ट मत आहे. हे मत कोणी कॉपी केले अनुसरले. प्रसारीत अथवा प्रचारित केले. आणि मी त्यावर ऑब्जेक्शन घेतले नाही तर मी चांगला.

आणि मी म्हणजेच सर्वज्ञ. मला सगळ्यातलं सगळंच करतं असा समज करून घेऊन आलेला अहंमपणा, स्वार्थ, मद ,मत्सर, अभिलाषा, हाव, आणि हे माझेच विचार आहेत याची जाणिव, म्हणजेच ( दैवशक्ती, दिव्यशक्ती, दिव्यज्ञान,बौद्ध,जैन, सम्यकज्ञान, आत्मज्ञान,स्वाभिमान ) जो जसा समज करून घेईल तसं. एकदा हा समज म्हणजेच तुमच्या मते दिव्यज्ञान ( शहाणपण) आलं की आपली पद, सत्ता यांवर हक्क, अधिकार प्रस्तापित करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. पण कुणाशी बरं हा संघर्ष असतो.

ज्यांनी तुमचेच आचार- विचार, संस्कार, नीती, कल्पना -संकल्पना, कलासंस्कृती, यांची कॉपी केली अशा वाईट व्यक्तींशी.

थोडक्यात आपली संस्कृतीचे, राष्ट्राचे, देशाचे, विश्वाचे विस्थारीकरण करणेऐवजी या संकुचित अहंमपणामुळे विस्थापीकरण करणेच हाती आले.

मी, माझा, माझे हाच अहंमपणा भारतीयांना गुलाम करण्यास खरे तर कामी आला असे माझे स्पष्ट मत आहे.

माणसांनी कर्तव्याबरोबरच जबाबदारीही येते याचे भान ठेवणे गरजेचे असते. आता आपली कोणी कॉपी केली तरी तर Intellectual Property Right बौद्धीक संपदा अधिकार हेभयानक शस्त्र अहंमपणेच्या त्या महानदेवापुढे मनोभावे अर्पण करण्यात आले.

आता बौद्धिक संपदा म्हणजे काय?

जेंव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था आपल्या बुद्धीचा वापर करून एखादी निर्मिती करते, तेंव्हा त्या निर्मितीवर मर्यादित काळापुरती तिला प्राप्त झालेली मक्तेदारी! त्या निर्मितीच्या प्रकारावरून बौद्धिक संपदा हक्क वेगवेगळ्या प्रकारचे असतात.

यांचे हक्कांसाठी माझेकडे कोणकोणती दैवी अस्त्र शस्त्र आहेत बरं?

  1. कला क्षेत्रातल्या निर्मितीवर – साहित्य,चित्र, शिल्प, संगीत, नाट्य किंवा चलचित्र इ. – यावर त्यांच्या निर्मात्याला कॉपीराईट(स्वामित्व हक्क) मिळतो.( म्हणजेच वेद, पुराणे, बौद्ध, जैन, साहित्य, त्रिपिटक, गुहा, लेण्या, स्तंभ, चित्रे, गाणी ( स्तुतीस्रोत)ओव्या, भारुडे, पोवाडे, लोकगीते,सीनेगीते, कोळीगीते, भिमगीते, असे बरेच)
  2. उत्पादनाची ओळख पटवणारे चिन्ह असेल किंवा ब्रॅण्डनेम किंवा उत्पादनाची ओळख बनलेलं घोषवाक्य, यावर ट्रेडमार्क मिळतो. ( म्हणजेच काय तर जात हाच ब्रॅण्ड, आणि जातिनिहाय कामे हाच ट्रेण्डमार्क)
    1. एखाद्या औद्योगिक उत्पादनाच्या सौंदर्यपूर्ण डिझाईनवर, कारचा किंवा मोबाईल फोनचा नाविन्यपूर्ण आकार, इ. वर इंडस्ट्रियल डिझाईनमिळते. ( म्हणजे धर्म, आणि त्याचे प्रतिके)
    2. एखादे भौगोलिक ठिकाण जेंव्हा त्या उत्पादनाची ओळख बनते, तेंव्हा त्यावर ‘जिओग्राफिकल इंडीकेटर’ (भौगोलिक निर्देशक)ही बौद्धिक संपदा मिळते. ( थोडक्यात चांगल्या वाईट ,देव राक्षस यांचे स्थान)
    3. तर एखाद्या नाविन्यपूर्ण उत्पादनावर किंवा उत्पादन बनवण्याच्या प्रक्रियेवर त्याच्या संशोधकाला मिळतं ते पेटंट (एकस्व) ! ( म्हणजेच इथे अंधभक्त यांचेपेक्षा काय बरं उत्पादन असावे. धर्माचा ठेका, मक्ता Right घेतलेल्यांचं मुळ उद्देश आहे.ज्ञानाचा प्रसार खंडित करून अज्ञानाचा प्रचार याच अंध भक्तांच्या उरावर बसून धर्माबद्दल अवास्तवी सहानुभूती, भीती, श्रेष्टत्वाची खोटी किर्ती, इतरांप्रतीची व्देषी मनोरुग्णवृत्तीचे अंध भक्तांना शिक्षण देऊन प्रशिक्षित करून माथेफिरु बनविणे.)

हे वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक संपदा हक्क त्यांच्या निर्मात्याला या निर्मितीवर ठराविक काळापुरते स्वामित्व हक्क बहाल करतात.

या काळात निर्मात्याच्या परवानगीशिवाय ही निर्मिती मग कुणीही वापरू शकत नाही; तिच्यावर तिच्या मालकाची या काळात मक्तेदारी असते.

निर्मात्याने ही निर्मिती करण्यासाठी जे कष्ट, पैसा, वेळ घालवला त्याचा मोबदला म्हणून देशाचं सरकार त्याला ही मक्तेदारी बहाल करते.

या कालावधीत तिच्या मालकाशिवाय दुसरे कुणीही ती गोष्ट बनवू शकत नाही. त्यामुळे त्या निर्मितीला बाजारात कुठलीही स्पर्धा नसते. स्पर्धा नसल्यामुळे मग तिचे भाव प्रचंड असतात. या वाढीव भावांमुळे मग बौद्धिक संपदा हक्क आणि इतर दुस-या कुठल्यातरी हक्कांमधे संघर्ष होणे अटळ होऊन बसते

तुम्हाला माझा सांगण्याचा उद्देश कळला. असं ग्रहीत धरणं म्हणजे माझं गुरुपन सिद्ध होत नाही. आणि तुम्हाला निरसन न होता शांत राहणं म्हणजे शिष्य, विद्यार्थी होत नाही.

मुळात कोणत्याही ग्रहीत, समज, अनाकलनीय, अंध, अज्ञान,अंधार,असत्य, अपप्रवृत्ती यांचंक्षालन, निरसन करून देणे हेच गुरूच काम आहे.आद्यकर्तृत्व आहे. भेदाचा वेध घेणं हाच त्यांचा मुलोद्धेश आहे. वेध म्हणजेच वेद असावे असं माझं मत आहे.

प्रश्न विचारणे यासाठीही खुप मोठे कौशल्य असावं लागतं बरं. मुळात उत्तर देणाऱ्या गुरुपेक्षा श्रेष्टत्व मिळवायचंच असेल तर गुरुला निरुत्तर करणाऱ्या महानप्रश्नकर्ताला हे प्रश्नांचतंत्र पंचतंत्र, पन्हं अवगत करावे लागेल.

कारण प्रश्नावरुनच उत्तराची खरी सत्वपरीक्षा ठरते.

मी क्वोरावर प्रश्न विचारतो ते बऱ्याचदा तंत्रशुद्ध नसते. मुळात प्रश्न एका ओळीत असावा माझं असताना प्रश्नात उपप्रश्न देऊन आतल्या गाटीचा प्रत्यय येतो. त्यामुळे होते काय.समान प्रश्नांचे संयुक्तीकर करणेच गरजेचे बनते.

तसंच समान धारणेतून एकत्र आलेल्या समाजाला अभिप्रेत अशा कला,साहित्य, आरोग्य,विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य इतर असंख्य शाखांविषयी असलेल्या प्रश्नांचा वेध घेऊन निरसन करण्या हेतू वेदांची निर्मिती झाली असेही माझे स्पष्ट मत आहे.

आणि धर्म म्हणजे तरी काय हो आपल्यातील असलेलं प्रेम चिरकाल कसं राहिल यासाठी केलेला प्रपंच म्हणजे धर्म ना !

ज्या उदात्त हेतूने समान आचार विचारांची माणसे एकत्र येऊन आपला समजच लोककल्याणाच्या, आपल्या संगतीच्या, संततीच्या, संस्कृतीच्या भल्यासाठी निर्माण केलेला कायदा. हा कायदा आपला समज, श्रध्दा, विश्वास, ज्ञान, वैभव, कौशल्य, यांचे रक्षण करील अशी जिथे धारणा उदयाला येते धर्माची स्थापना मला तरी वाटतं खऱ्या अर्थाने तिथेच होते.

या धर्माचे दोन विभागात भेद झाले. जो सजिव आहे या जीवाचे दोन जातीत विभाजन झाले ते भक्त भेदामुळेच. जीव हाच ईश्वर असताना हे भेद करण्यात आलेले होते. ते भेद पाचप्रकारे करण्यात आले.

भेदाची व्याख्या : जीव आणि ईश्वरात भेद आहे, असे समजणे हीच भेद-भ्रांती होय.

  1. जीव - ईश्वराचा भेद.
  2. जीव - जीवाचा भेद.
  3. जीव - जडाचा भेद.
  4. जड - ईश्वरचा भेद.
  5. जड - जडाचा भेद.

असे एकूण पांच भेद आहेत. माझ्या मते पंचमहाभूतांमध्ये हे भेदाचे भांडण फक्त श्रेष्ठत्वाच्या भ्रांमक अहंपणातून झाले असावे.

डार्विनच्या सिद्धांन्त आणि भारतीय सिध्दांन्त यांत साम्य आहे नव्हे तर मुर्खांनो ते एकच आहे.

जगाने भारतातल्या अज्ञानाचा पुरेपुरे फायदा घेतला.

मलाही तर कांही वेळा प्रश्नच पडतो की,अनेक चमत्करांनी भरलेले जग कसे निर्माण झाले? आधी कोंबडी की आधी अंडे? या सारखाच कांहीतरी प्रकार असावा.

कोंबडीचा जन्म अंडयातून होतो. प्रथम अंडे तयार झाले असे म्हणावे, तर अंडे घालयला अगोदर कोंबडी पाहिजे, प्रथम कोंबडी तयार झाली असे म्हणावे तर, अंडयाशिवाय कोंबडी कशी तयार झाली ?
हाच प्रश्न अंडी न घालणाऱ्या पण पिल्लांना जन्म देणाऱ्या प्राणी व मानव यांच्या बाबतीत विचारता येईल. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला जन्माला घालतो. पहिला प्राणी कसा निर्माण झाला? पहिला मानव कसा निर्माण झाला? वनस्पती सृष्टीबाबत आधी एक झाड, का आधी बी असे या प्रश्नाचे स्वरूप आहे.
वरील प्रश्न साररूपाने एकत्र करता येतील. पृथ्वीवर प्राणी, वनस्पती इत्यादी म्हणजे जीवसृष्टी कशी निर्माण झाली व केंव्हा निर्माण झाली? याच्याही पुढे जाऊन एवढी विविधता धारण केलेली पृथ्वी कशी व केव्हा निर्माण झाले?

वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न फार पूर्वीपासून मानव करीत आला आहे. पहिला प्रयत्न म्हणजे विविध धर्मांतील तत्वज्ञांनी मांडलेल्या कल्पना. परमेश्वराने जीवसृष्टी व विश्वाची निर्मिती केली असे सर्व धर्म सांगतात.

पण धर्ममार्तंडांच्या या कल्पना म्हणजे ६ आंधळे व एक हत्ती या कथेतला प्रकार होय. सहा आंधळ्यांनी हत्तीच्या विविध अवयवांना स्पर्श केला व प्रत्येक जण हत्तीचे वर्णन दुसऱ्याला सांगू लागला. शेपटाला स्पर्श केलेला अंधळा म्हणाला, 'हत्ती दोरीसारखा आहे,' कानाला स्पर्श केलेला अंधळा ओरडला, 'हत्ती सुपासारखा आहे,' सोंडेला स्पर्श केलेल्या आंधळ्याच्या मते हत्ती अजगरासारखा असला पाहिजे. बायबलमध्ये परमेश्वराने ६ दिवसांत सृष्टी निर्माण केली असे वर्णन.

अॅडम व इव्ह ही पुरुष-स्त्रीची जोडी स्वर्गातून पृथ्वीवर आली व त्यांच्यापासून मानव पुनरुत्पादित होत राहिला असे बायबल सांगते, तर हिंदू धर्मग्रंथात वेगळीच कल्पना.मनूपासून मानवसृष्टी बनली असे हिंदूधर्म सांगतो. ब्रम्ह्याच्या डोक्यापासून ब्राम्हण, पायापासून शुद्र निर्माण झाले. पृथ्वी शेषाने धरली आहे, विविध धर्मांतील विश्व, पृथ्वी व जीवसृष्टी यांच्या निर्मितीच्या कल्पना वेगवेगळ्या, कशाचा कशाला मेळ नाही, कुठेही संगती नाही. कोणत्याही गोष्टीला कसलाही पुरावा नाही.
जीवसृष्टी ही परमेश्वराची निर्मिती (Special creation) आहे. ही उपपत्ती कोणाही बुद्धिमान माणसाला पटणार नाही, याचे कारण 'खास निर्मिति' ही केवळ कल्पना आहे. सत्य नव्हे.

इजिप्तमध्ये नाईल नदीच्या चिखलापासून सुसर तयार होते, असे मानले जाते. विंचू आणि माश्या शेणापासून तयार होतात अशी कल्पना होती. या उपपत्तीला (Spontaneous creation) स्वाभाविक निर्मिती म्हणतात.

१९ व्या शतकाच्या उत्तर्राधापर्यंत स्वाभाविक निर्मितीच्या उपपत्तीला उत्तर नव्हते. इटालियन डॉक्टर रेडी स्पॅलनाझिनी, फ्रेंच रसायनतज्ञ पाश्चर यांच्या प्रयोगांनी स्वाभाविक निर्मितीची उपपत्ती चुकीची असल्याचे सिद्ध झाले. कुजणाऱ्या मांसात ज्या अळया दिसतात त्या मांसापासून बनत नाहीत, तर मांसात असलेल्या सूक्ष्म अंडयांपासून तयार होतात. ही अंडी हवा,पाणी यांच्याद्वारे अगर मुळातच मांसात असतात; ती डोळ्यांना दिसत नाहीत. मांस उकळून सीलबंद भांड्यात ठेवले तर त्यांच्यात अळया होत नाहीत, हे रेडीने दाखवून दिले. रेडी, पाश्चरच्या प्रयोगांनी स्वाभाविक मिर्मितीची कल्पना मागे पडली.

डार्विनचा सिध्दांन्त काय सांगतो,

डार्विनच्या उत्क्रांती तत्वाप्रमाणे अनेक दशलक्ष वर्षांपूर्वी एकपेशी जीव पृथ्वीतलावर निर्माण झाले. या एकपेशी जीवामध्ये हळूहळू बदल होत जाऊन आज दृष्टीस पडणारी प्राणी व वनस्पती सृष्टी आकाराला आली. ४०० दशलक्ष वर्षांपूर्वी पहिला पाठीचा कणा असलेला आदीमच्छ निर्माण झाला. त्याच्यात हळूहळू बदल होऊन मासे तयार झाले, माशांपासून बेडकांसारखे उभयचर प्राणी, उभयचर प्राण्यांपासून महाकाय सरपटणारे प्राणी, या प्राण्यांपासून पक्षी व सस्तन प्राणी विकास पावले. सस्तन प्राण्याची एक शाखा माकडाची; माकडामध्ये उत्क्रांती होऊन मानव निर्माण झाला.

पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे कसे निर्माण झाले ?

या प्रश्नाचे उत्तर खगोल वैज्ञानिकांनी दिले आहे. विश्वाच्या निर्मितीच्या आरंभी हायड्रोजन वायूचे प्रचंड ढग अवकाशात फिरत होते. अपघाताने या अनुकणांची पॅकेट तयार झाली. गुरुत्वाकर्षणाने पॅकेट संकोच पावून त्यापासून तारे बनले. ताऱ्यांच्या अंतरंगात हायड्रोजनच्या फ्युजनमधून इतर मूलद्रव्ये तयार झाली. ताऱ्याच्या स्फोटातून ही द्रव्ये आकाशात विखुरली गेली. त्याच्यापासून सूर्यासारखे नविन तारे जन्माला आले. पृथ्वी सूर्यापासून तयार झाली.

पृथ्वीवर जीवांचा विकास कसा झाला.?

विज्ञानातील अलीकडच्या संशोधनाचा निष्कर्ष असा-
अंदाजे ५००० दशलक्ष वर्षापुर्वी पृथ्वी निर्माण झाली. ३००० दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर सागर तयार झाले.

या पाण्यात शर्करा, अॅमिनो अॅसिडपासून मोटीनचे रेणू बनले. न्यूक्लिक अॅसिडस् तयार झाली. न्यूक्लिक अॅसिड व प्रोटीन्स यांच्या संयोगातून जीन्स व व्हायरस निर्माण झाले. पुढचा टप्पा म्हणजे यातून बॅक्टेरिया अल्गी, अमीबासारखे एकपेशी प्राणी निर्माण होण्याचा. हेच आदिजीव आपले सर्वांचे पूर्वज.


प्रत्येक जिवंत प्राण्याच्या पेशीत असलेली अॅमिनो अॅसिडस् इक अॅसिडस् व न्यूक्लिक अॅसिडस् ही त्याची मूळ घटक असलेल्या अमोनिया, मिथेनपाणी यांच्या संयोगातून निर्माण करता येतात, हे मिलर या अमेरिकन वैज्ञानिकाने दाखवून दिले. हा अचेतन वस्तूपासून सचेतन सृष्टी निर्माण झाली याचा पुरावा होय.

Comments

Popular posts from this blog

निषाद राज एकलव्य

तिब्बत देश का असली नाम " बोद " ( Bod ) है

The world’s 10 most awesome giant Buddhas