तू बौद्ध असलास तरी शेवटी तू माणुसच ना?

काल आपल्या एका मित्राने प्रा.सुकुमार कांबळे सरांची पोस्ट शेअर केली,ज्यामध्ये सुरुवातीलाच शीर्षक आहे,'मी बौद्ध धर्म स्वीकारलेने मला कोण पोरगी देईना'

यामध्ये ते दोन मातंग पालकांची उदाहरण देतात एकाने ते बौद्ध झालेने नाकारले तर एकाने
"तू बौद्ध असलास तरी शेवटी तू माणुसच ना,असे बोलून त्यांनी त्यांची मुलगी दिली.आज त्या सरांचे सहचारिणी बनून सुखाने संसार करत आहेत.

मात्र तिसऱ्या उदाहरणात एका बौद्धाने जो पूर्वीश्रमीचा महार त्याने 'तू बौद्ध असलास तरी शेवटी मांग आहेस म्हणून मी तुला मुलगी देत नाही,असं म्हणत मुलगी नाकारली व परत इकडे फिरकलास तर दांडक्याने मारेन असा सज्जड दम दिला.'

हा दमच सरांना सर्वांत जास्त जिव्हारी लागलेने ते सर्वत्र मी मातंग बौद्ध झालो पण मला पूर्वाश्रमीच्या महार बौद्धांनी मुलगी दिली नाही,नाकारली म्हणून सर्व सभेत जाहीर कार्यक्रमात सांगत असतात,असो सांगणेमध्ये वाईट नाही,जो आला कटू अनुभव तो सांगत आहेत पण याचा गैरफायदा बौद्धेत्तर बौद्ध धर्म व समाजाविषयी अगोदरच प्रश्न आहे,आकस आहे मनात अडी आहे बौद्ध स्वीकारनेमध्ये कमी पणा वाटतो किंवा बौद्ध धम्म स्वीकारनेचे आकर्षण आहे पण अश्या उदाहरणामुळे प्रश्न चिन्ह निर्माण होतात ते तथाकथित पुरोगामी याचा बाऊ करतात सर्वत्र सांगत सुटतात की बौद्ध जरी तुम्ही झाला तरी तुमचे प्रश्न सुटनार नाहीत तिथे जाऊन तुमची जुनी जात चिकटून राहणार तिथे जातिव्यवस्था तशीच बळकट राहणार तुम्हाला कोण मुलगी देणार नाही कोण रोटी बेटी व्यवहार करनार नाही हा चुकीचा संदेश सर्वत्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रसारला जात आहे.

तेंव्हा सरांना व बौद्ध धम्माविषयी आकृष्ट असले नसलेल्या सर्वाना विनंती आहे बौद्ध होणे बाबत व होणाऱ्या बाबत काही जणांची ऍलर्जी आहे जर प्रश्न आहेत ते पहिले दूर करूया काही विचाराने बौद्ध न झालेल्या बाबासाहेब न  कळलेल्या महार म्हणूच हिंदू मानसिकतेच व गुलामीच जीवन जगणाऱ्या व तसा क्वचित व्यवहार करणाऱ्या व तसा अपवादात्मक अनुभव आलेल्या मूर्ख माणसांची उदाहरणे सार्वत्रिक सरसकटीकरण करून प्रसारित करू नका व बुद्ध धम्माच्या समतावादी क्रांतिकारक तत्वज्ञानाला व बाबासाहेबांचे सर्व भारत बौद्धमय करेन या स्वप्नाला तिलांजली देऊ नका.

बौद्ध धम्मात सुधारणेला वाव आहे तो सर्वांनी मिळून करूया चुकीचं काही असेल तर दुरुस्त करून पुढे नेवुया,अधिक वाढवूया,
विरोधी प्रचार व प्रसाराला बळी न पडता अन्यथा इकडे येऊनही काही प्राथमिक कटू अनुभवांना अधिक मोठं करून आपणच आपले धम्म विरोधी प्रचार करतोय असे होईल व त्यामुळे बौद्ध धम्म विरोधी शक्तींना मनुवादयांना व काटावर राहणाऱ्यांना पुरोगाम्यांना हसायला व खोडसाळ प्रचार करणेला तेवढाच वाव मिळेल.

#अर्थात प्रा.सुकुमार कांबळे सरांविषयी नितांत आदर आहे,त्यांचं धर्मांतराबाबतच मोठं काम आहे,त्यांनी हजारो मातंग बांधवांना बौद्ध धम्माची दिक्षा देणेचे कार्यक्रम घेतलेले आहेत,त्यांना धम्म प्रवर्तित केलेले आहे.त्याबद्दल सरांविषयी कृतज्ञता आहेच,मात्र वरील स्वरूपाच्या चुकीचा आशय जाणाऱ्या व गैरसमज होणाऱ्या प्रचाराबाबत त्यांनी थोडा विचार करावा ही विनंती आहे.

#बाकी त्यांचं व बौद्ध धम्म स्वीकारलेल्या सर्व बांधवांच स्वागतच आहे,अभिनंदन त्यांचे, व क्रांतिकारी जय भीम,
जय बौद्ध भारत..   

शाहीर दिपकभाई गोठणेकर यांची पोस्ट

शाहीर गोठणेकर यांनी  कथन केलेले अनुभव वेदनादायी आहेत, समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या मनात अजुनही आपल्या  मागील जातीची आठवण आहे, असु द्या, 
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मशाल हाती घेऊन निघालेला महार समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या लक्षात येत नाही का की रोटी बेटी  व्यवहार झाल्या शिवाय जाती व्यवस्था नष्ट होणार नाही.  बौध्द धम्म जात मानत नाही मग जे असा विचार करून मुलांना फक्त आपल्या पुर्वीच्या जातीतील जोडीदार शोधतात, हे धर्मांतराला घातक आहे.  बौध्द भिक्कूनी ह्या विषयावर अश्या लोकांचे प्रबोधन करावे.  नाहीतर ईतर  जातीय बौध्द धम्म स्वीकारणार नाहीत. त्यामुळे धम्म चळवळीस खिळे बसेल.

सर,प्रा.सुकुमार कांबळे सरांचे अभिनंदनच! पण
     असा अनुभव क्वचितच येतो आणि तो प्रदीर्घ काळासाठी नसतो.असा अनुभव येण्याचा आभास झाल्यास काही वेळासाठी अर्थात काही दिवस,महिने आपण स्वत: व समोरच्या व्यक्तिस विचार करायला वेळ द्दयावा,जेणेकरुन त्यांच्या विचारात बदल होऊन प्रबोधन होईल.तसे दिसल्यास मार्ग मोकळा होतो.माझा स्वत:चा असा अनुभव आहे की मार्ग मोकळाच होतो आणि आपणास हमखास यश येतेच.
 परंतु अशा सांशक पोस्टी समाज माध्यमावर प्रदर्शित करू नये.
सस्नेह जयभीम!
🌹🌷🌺🤝

मला वाटते सरांचा गैरसमज काही ना काही कमी होईल. जेथून मातंग आलेत तेथूनच महार सुद्धा आले आहेत निश्चितच बेटी व्यवहार करतांना नाती टुटू नये असे बघतात. पण शिक्षणाने एक दोन पिढी गेल्यानंतरच कोण मातंग कोण महार माहीत पडणार नाही.

सुकुमार कांबले ने खूप इंपॉर्टन्ट मेसेज दिला आहे.
2006 ला हजारो भटके विमुक्त बौद्ध झाले त्यांचे रोटी बेटी चे काय?

जर माझी मुलगी उद्या बौद्ध म्हणून कोणत्याही मुलाशी लग्न करायला तयार असेल तर मी नक्की समर्थन करेल.

कारण धम्म हा फक्त चर्चे चा विषय नाही

त्या पोस्ट मधील सर्वात तकट्वान गोष्ट ही होती की सुकुमार कांबळे यांनी लग्न बौद्ध पद्धतीने करणार असे ठरविले होते, ते त्यांनी कोणते ही compromise na करता शेवटी मातंग मुलीशी बौद्ध पद्धतीने लग्न केले.
ही बाब अभिनंदनीय आहे.
मनाची किती ताकत आहे.

आमचे तुमचे करणे कधी बंद होईल सर,मांतग समाजाचे,
रोजच दोन तीनवेळा अनुभव,मला.

take care कीती वेळा .
धन्यवाद सर,

बौध्दांसोबत मांतग व ईतर समाज ऐकत्र झाला तर जातीयवादी COMPANY खल्लास!!!!

सुवर्ण काळ येण्याला कोणी रोखु शकणार नाही.

सर,
thanks .

सहमत आहे. शब्दांकन वेगळं केलं पाहिजे होत त्यांनी... सध्या तरी ती त्यांची "खंत" म्हणून घेऊया "तक्रार" म्हणून नको...

सहमत ,पण थोड्या अवधी नंतर परस्थिती सुधारेल ! जय भिम !!

लेख वाचला, एवढेच सांगायचे की सर्व बैध्द,( महार)  अशा वृतीचे नाहीत, पुढारलेला समाज समाज आहे, जातपात या पलीकडे समाज गेला आहे, बौध्द (महार) व मातंग यांनी सौदर्साचे संबंध निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत . कलश निर्माण करू नये. माझ्या गावात मी बौध्द व मातंग यांना सोबत व एका रांगेत जेवन देतो. व मला बोलावले तर आनंदाने व स्वाभिमान ने त्यांच्या सोबत राहतो.

Comments

Popular posts from this blog

निषाद राज एकलव्य

तिब्बत देश का असली नाम " बोद " ( Bod ) है

The world’s 10 most awesome giant Buddhas