‘वेद’
‘वेद’
(1) भूमिका
भारतीय समाजामध्ये ज्या वाङ्मयाला सर्वोच्च स्थान आहे त्या वाङ्मयाचे नांव ‘वेद’ असे
आहे. वेद हे केवळ भारतीयच नव्हे तर समस्त जगातील वाङ्मयापैकी अत्यन्त प्रचीन आहेत. वेद
निव्वळ अतिप्राचीन नव्हेत तर त्यांना एकप्रकारचे दिव्यत्व लभलेले आहे, त्यामुळेच त्यांचे
स्वरूप अपौरुषेय असल्याचे मानले जाते. ‘अपौरुषेय’ म्हणजे कुणाहीकडून निर्माण न झालेले,
विश्वाच्या अरम्भापासून स्वतःच अस्तित्वात असलेले, असे जे आहे ते.
‘वेद अपौरुषेय आहेत’ आणि ‘ते अपौरुषेय नाहीत’ असे दोन्ही प्रकारचे सिद्धान्त खूप
पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. प्रस्तुत प्रकल्पाचा हेतू वेदांच्या अपौरुषेय असण्या
नसण्यासम्बन्धी निर्णय करणे असा नसून, ही अपौरुषेयत्वाची कल्पना काय आहे अणि तिचे
महत्व काय आहे यासम्बन्धीचा विचार करणे असा आहे.
एक गोष्ट अत्यन्त स्पष्टपणे नमूद केली पाहिजे की, वेदांच्या अपौरुषेय असण्या नसण्या
सम्बन्धीची चर्चा करण्याचा अधिकार खरे पाहाता शास्त्रवेत्त्या पण्डितासच आहे. अशा
पण्डिताचा चाऱ्ही वेदसंहिता, ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे आणि सहा वेदाङ्गे, या सर्व
शास्त्रांचा किमान सैद्धन्तिक दृष्टीने अभ्यास झालेला असावा.
तसा अभ्यास नसताना या विषयाची चर्चा करणे म्हणजे दूरदर्शनवर क्रिकेटचा समना
पाहाणाराने सचिन तेण्डुलकरच्या खेळातील कौशल्याची मीमांसा करण्यासारखे आहे. तरीही
आपल्या थोडक्या अभ्यासातून काही विचार येथे माण्डायचा प्रयत्न केला आहे, त्याची माझ्या
अल्पज्ञानानुसारच समीक्षा व्हावी असे निवेदन.
»
(2) वेद म्हणजे काय ?
2.1 ‘वेद’ शब्दाचा व्याकरणात्मक अर्थ
संस्कृतात कोणत्याही शास्त्रासम्बन्धी विचार करताना त्या शास्त्राच्या नावाची
व्याकरणात्मक मीमांसा केली जाते आणि तसे करणे शास्त्राच्या व विषयाच्या अकलनास
उपयोगी ठरते. त्यानुसार ‘वेद’ शब्दाचा अर्थ पाहू -
पाणिनीय धातुपाठ व अष्टाध्यायीच्या नियमांनुसार ‘विद’ या द्वितीयगणातील परस्मैपदी
सकर्मक धातूपासून घञ् प्रक्रियेने निर्माण होणारा पुंलिङ्गी शब्द म्हणजे ‘वेद’. या धातूचे
‘जाणणे’, ‘समजणे’, ‘ध्यान करणे’, ‘मनन करणे’, असे अर्थ आहेत, अर्थात् ‘वेद’ म्हणजे ‘ज्ञान’.
2.2 वेद वाङ्मयाची व्याप्ती
वेदांच्या अपौरुषेयत्वाबद्दल विचार करण्यापूर्वी वेद वाङ्मय म्हणजे नेमके काय हे लक्षात घेतले
पाहिजे, कारण त्यामुळे आपल्या विषयाची व्याप्ती लक्षात येते.
वेद या शब्दाने सामान्यपणे सम्पूर्ण वैदिक वाङ्मय सूचित होते. ते वाङ्मय असे - संहिता,
आरण्यके, ब्राह्मणे, उपनिषदे आणि परिशिष्टे.
परन्तु संहिता भाग सोडल्यास इतर सर्व वाङ्मय परम्परेने मानवरचित मानले जाते म्हणून
त्यांच्या अपौरुषेयत्वाची चर्चा करण्याचा प्रश्न येत नाही. या प्रकल्पापुरता विचार
करावयाचा ठरवला तर ऋक्, साम, यजुस् , आणि अथर्व, अशा चार संहितांकरिताच वेद संज्ञा
वापरली जाणार आहे.
असे मानले जाते की संहिता वाङ्मय हे खूप पूर्वी (म्हणजे नेमके किती पूर्वी, हे नक्की
कुणालाच माहित नाही) एकगठ्ठा होते. व्यास महर्षींनी त्याचा सम्पूर्ण अभ्यास केला व
पुढील मण्डळींच्या सौकर्यासाठी या वाङ्मयाचे निरनिरळ्या विषयानुरूप वेगवेगळे चार भाग
केले. एकेका भागास अनुक्रमे ऋक् , साम, यजुस् आणि अथर्व अशी त्यांच्या विषयानुसार नांवे दिली.
2.3 वेद (संहिता) वाङ्मयाचा निर्मितिकाल
वेदांच्या निर्मितिकालाविषयी निश्चित, प्रमाणसिद्ध अशी कोणतीच माहिती उपलब्ध
नाही, याचे मुख्य कारण म्हणजे हे वाङ्मय अतिशय प्राचीन आहे. किम्बहुना, मानववंशाच्या
उपलब्ध वाङ्मयातील, वेद हेच सर्वांत प्राचीन आहे, असे म्हणता येईल.
तरीही अनेक पुरातत्ववेत्त्यांनी अपार कष्ट करून असे अनुमान काढले आहे की, चार वेदांपैकी
ऋग्वेद हा सर्वांत प्राचीन असून त्याच्या निर्मितीला साधारणपणे ख्रिस्तपूर्व 3000
वार्षांपूर्वी सुरुवात झाली. याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत पण तरीही आजच्या अधिकांश
तज्ज्ञांना वरील मत मान्य आहे.
आज उपलब्ध असलेली अक्खी ऋग्वेद संहिता एकाच वेळी, किंवा फार थोड्या कालखण्डात
निर्माण झाली असे मानणे चूक ठरेल. अत्यन्त प्रदीर्घ अशा काळात, किम्बहुना शेकडो वर्षे
या वेदांची निर्मिती होत राहिली हे त्या वाङ्मयाच्या अभ्यासावरून स्पष्टपणे लक्षात येते.
(आपण या प्रकल्पाच्या विषयापासून फारकत घेत आहोत असे वाटत असले तरीही वेदांच्या
अपौरुषेयत्वाबद्दल विचार करताना ही चर्चा नक्की उपयोगी पडेल.)
वेदवाङ्मयाच्य निर्मितीसोबतच त्या वाङ्मयाच्या स्वरूपाबद्दलही थोडक्यात आढावा घेतला
पाहिजे.
2.4 वेद (संहिता) वाङ्मयाचे स्वरूप
सम्पूर्ण संहिता वाङ्मय मन्त्रात्मक आहे. हे मन्त्र तत्कालीन, म्हणजे आजपासून साधारण 4 -
5 हजार वार्षांपूर्वीच्या संस्कृत भाषेत आहे. याच भाषेला सामान्यपणे ‘वैदिक संस्कृत’ असे
सम्बोधिले जाते. स्थान-काल-परत्वे याच भाषेत उत्तरोत्तर परिवर्तन होऊन पाणिनीय व
नन्तरच्या काळत जी भाषा तयार झाली तिला आपण ‘अभिजात संस्कृत’ असे म्हणतो.
वेदांची भाषा अत्यन्त ओघवती, काव्यपूर्ण आणि प्रचण्ड अर्थवाही आहे. पण तरीही संस्कृत
भाषेचे आणि त्याद्वारे प्राचीन समाजाचे एक स्पष्ट चित्र वेदांमधून अपाल्या डोळ्यापुढे उभे
राहाते.
आधी पाहिल्याप्रमाणे संहितावाङ्मय चार भागांत विभागलेले असे आपल्यापुढे आहे. त्याचे
सर्वसाधारण स्वरूप खालीलप्रमाणे आहे -
2.4.1 ऋग्वेद
हा सर्वांत प्राचीन आहे. याचे स्वरूप सूक्तात्मक आहे. निरनिराळ्या ऋषींनि रचलेली
निरनिराळ्या देवतांची स्तुतिपर सूक्ते यामध्ये आहेत.
ज्याप्रमाणे आधुनिक माराठी कवितेत चरण किंवा ओळ असते त्याप्रमाणे सूक्ताला ऋचा (मूळ
संस्कृत शब्द ‘ऋच् ‘) असतात. ही सूक्ते प्राधान्याने स्तुतिपर असल्यामुळे या वेदास स्तुतिपर
ऋचांचा वेद अर्थात् ऋग्वेद हे नांव प्राप्त झाले असे म्हणता येईल. ऋग्वेदातील एकूण
सूक्तसङ्ख्या 1123 इतकी आहे.
2.4.2 यजुर्वेद
यजुर्वेद हा नांवाप्रमाणेच यज्ञक्रियेशी सम्बन्धित आहे. यज्ञयागासाठी लागणाऱ्या मन्त्रांचा
ह्यामध्ये समावेश आहे. यज्ञाच्या अग्नीत हवि अर्पण करतेवेळी म्हणावयाच्या मन्त्रांसोबतच
यज्ञप्रक्रियेच्या पूर्वतयारीचे तसेच यज्ञप्रक्रियेच्या सर्व उपाङ्गांचे मन्त्र सुद्धा यात आहेत.
यजुर्वेदाच्या दोन अवृत्ती असून त्यांना अनुक्रमे कृष्णयजुर्वेद व शुक्लयजुर्वेद अशी नांवे आहेत.
2.4.3 सामवेद
सामवेद सुद्धा मन्त्रात्मक आहे. यातील 75 मन्त्र स्वतन्त्र तर अन्य मन्त्र ऋग्वेदातून घेतलेले आहेत.
मन्त्र गायच्या साङ्गीतिक चालींना ‘साम’ म्हटले जाते. ‘साम’ ह्या शब्दाच अर्थ
‘गायनासहित’ असा होतो. यावरून हे लक्षात येईल की सामवेद हा मन्त्रांच्या
गायनाकरिता आहे. यज्ञाच्या वेळी काही देवतांची स्तुती वेगवेगळ्या चालींत मन्त्र गाऊन
केली जाते, त्यावेळी सामवेदातील मन्त्रांचा उपयोग केला जातो.
2.4.4 अथर्ववेद
अथर्ववेद सुद्धा प्राचीन असून, मन्त्र, ऋचा, स्तोम, असे निरनिराळे काव्यप्रकार यात
आढळतात. आधिभौतिक पीडा-निवारणासाठी तान्त्रिक जादू-टोणा चमत्कृती इ० उपाय यात
असल्यामुळे अथर्ववेदावर एकप्रकारचे गूढत्व लादले गेले आणि त्याची प्रतिमा काहीशी
नकारात्मक झाली.
तरीदेखील शस्त्रविद्या, वैद्यकशास्त्र, युद्धनीति, गृहस्थधर्म, गणित इ. अनेक व्यावहारिक
शास्त्रांचा अधार या वेदामध्येच सापडतो. 20 व्या शतकात सम्पूर्ण जगात कीर्ती
मिळवणाऱ्या वैदिक-गणिताची सर्व मूलभूत सूत्रे अथर्ववेदातच समाविष्ट आहेत
वरील सर्व मिळून साधारण अडीच हजार सूक्ते उपलब्ध होतात. यांमध्ये विषयांचे वैविध्य
प्रचण्ड आहे. प्रथमदर्शी, वेदवाङ्मय स्तुतिपर आहे असे जरी म्हटले, तरी स्तुतीचे प्रकारही
निरनिराळे आहेत.
स्तव्यविषयही प्रत्येक वेळी एकच आहे असे नाही. प्रत्यक्ष परमेश्वर (ब्रह्मन् ), प्रकृति
(निसर्ग) आणि काही प्राकृतिक तत्त्वे, पंचमहाभूते, दैवत पदाला पोहोचलेले मानव, तपस्वी
पुरुष, द्रष्टे ऋषी, तेजस्वी प्रज्ञावन्त, पराक्रमी पुरुष, अशा अनेकांची स्तुती करणारी सूक्ते
आहेत.
धर्म, यज्ञयाग, इतिहास, पुराण, तत्त्वज्ञान, दैवतोपासना, कर्मकाण्ड, समाज-जीवन,
गणित-विज्ञान, वैद्यक, युद्धनीती, शस्त्रविद्या, गूढविद्या, तन्त्र, इ० अनेक विषयांवर
अत्यन्त सखोल चिन्तन वेदांमध्ये आढळते. यावरून वेदांच्या उपायोजनासम्बन्धी आणि पुढे
त्याच्या अपौरुषेयत्वासम्बन्धी निश्चितपणे काही मते माण्डता येतील.
(3) वेदांचे प्रयोजन अथवा उपायोजन काय
3.1 वेदांची निर्मितिप्रक्रिया
ज्या काळात वेदांची निर्मिती झाली त्या काळात तिचे प्रयोजन काय होते याचा विचार
करणे खूप कठीण आहे . याचे कारण, तो काळ निव्वळ अतिप्राचीन आहे, एवढेच नसून त्या
काळातील समाज जीवन, जनरीती, भाषा-व्यवहार, लोक-व्यवहार, हे सर्व वेगळ्या स्वरूपाचे
होते. लोकांच्या भौतिक गरजा, त्यांना पडणारे व्यावहारिक आणि तात्त्विक प्रश्न, ते
सोडवण्याकरिता उपलब्ध साधने, व्यावहरिक गरजा भागवण्याकरिता लगणारा वेळा आणि तो
सोडून इतर तात्त्विक मुद्द्यांची चर्चा किंव चिन्ता करण्याकरिता मिळणारा वेळ व
त्याकरिता लागणारी शारीरिक-मानसिक बैठक आणि सामर्थ्य, या सर्वच बाबतीत वैदिक
समाज हा आपल्याहून खूप भिन्न होता. एकमेकांशी संवाद साधण्याचे मार्ग आजच्याहून
बऱ्यापैकी भिन्न होते. त्यामुळे वेदांची निर्मितिप्रक्रिया कशी होती याबद्दल निव्वळ
अन्दाज बान्धता येतात.
तरीही एक जाणवते, की वेदांची निर्मिती अनेक वेळेस अत्यन्त निर्हेतुकपणे झाली असावी.
तपस्वी आणि द्रष्ट्या ऋषी मुनींना चित्ताच्या अत्यन्त उन्मनी अवस्थेत काही खूपच आन्तरिक
असे अनुभव आले ज्यांचे वर्णन त्यांनी तेव्हांच किंवा मागाहून सूक्तांद्वारे केले. अशाप्रकारची
सूक्ते ही बहुधा पूर्णपणे स्तुतीपर (उदा० देवतांची सूक्ते) किंवा तत्त्वात्मक (उदा० पुरुषसूक्त,
नासदीयसूक्त) आहेत.
पण काही काही वेळेस सहेतुक निर्मितीही झालेली असावीसे वाटत. विशेषतः अथर्ववेदातील
वैद्यकविद्या, शस्त्रविद्या, गणित, इ. निरनिराळ्या शास्त्रांशी सम्बन्धित मन्त्र हे केवळ
उन्मनी अवस्थेतील आधिभौतिक अनुभवांतून आलेले आहेत असे म्हणता येणार नाही.
3.2 यज्ञक्रियेत वेदमन्त्रांचे उपायोजन
वैदिक काळात यज्ञसंस्था अत्यन्त विकसित आणि प्रभावी होती. समाजातील अनेक स्तरांत
विविध कारणांसाठी यज्ञ करण्याची पद्धत होती. त्यामुळे, यज्ञयागादि क्रियांसाठी
वेदामन्त्रांची निर्मिती झाली असे मानणारे काही विचारवन्त आहेत. वेदमन्त्रांचा
प्रामुख्याने यज्ञकाण्डासाठी होणारा वापर पाहाता, त्यांचा हा विचार पूर्णपणे चुकीचा
जरी नसला तरी वेदांतील प्रत्येक मन्त्र हा यज्ञयागासाठीच रचला गेला असे म्हणणे चूक ठरेल.
अशीही काही सूक्ते आहेत, ज्यांचा यज्ञ क्रियेशी विशेष सम्बन्ध दिसून येत नसताना काही
विद्वान् मण्डळींनी यज्ञक्रियेच्या मन्त्रांमधे त्यांचा समावेश केला. त्यांचे मूळ स्वरूप पाहाता
त्यांचा यज्ञाशी थेट सम्बन्ध दिसत नाही आणि म्हणून यज्ञविधीकरिता त्यांचे प्रयोजन खास
नाही.
उदा० निधन शान्तीचा होम करताना काही यजुर्वेदीय पुरोहित नासदीय सूक्ताचे पठण करतात.
नासदीय सूक्ताचे स्वरूप हे तत्त्वज्ञानपर आहे. सृष्टीच्या निर्मितीप्रक्रियेची चर्चा करणारे
हे सूक्त असून सृष्टीच्या मूळ कर्त्यासम्बन्धी एखाद्या तत्त्वज्ञास पडणारे प्रश्न या सूक्तात
माण्डलेले आहेत.
एखाद्या व्यक्तीच्या निधनामुळे घरात व आजूबाजूच्या परिसरात निर्माण झालेल्या
व्याधीप्रवर्तक जन्तूंचा नाश करणे व घरातील इतर मण्डळींचे मानासिक दुःख शमविणे हा या
निधनशान्तीचा प्रमुख हेतू असावा. अशा परिस्थितीत नासदीय सूक्तासारख्या तात्विक चर्चेचे
औचित्य किती, हा प्रश्नच आहे.
(आधुनिक काळात लोकांना मुळातच संस्कृत समजत नाही त्यामुळे आशा शन्तीहवनात नासदीय
सूक्ता ऐवजी त्याच चालीवर पुरुरवा-उर्वशीचे प्रणय सूक्त म्हटले तरी लोकांवर त्याचा
तेवढाच प्रभाव पडेल यात शङ्का नाही !)
तरीही जवळ जवळ दोन सहस्रके वेदांचे उपायोजन प्रामुख्याने यज्ञकांडातच झाले असे दिसून
येते. कदाचित त्यामुळेच वेदांवर भाष्य करणाऱ्या अनेक विद्वांसांचा कल हा यज्ञवैधानिक
स्वरूपाचा असतो. सामान्यपणे यज्ञाला चार प्रमुख पुरोहित व प्रत्येकाचे तीन साहाय्यक असे
एकूण सोळा पुरोहित असत. हे चार पुरोहित, त्यांची यज्ञातील कार्ये व उपायोजनाचे
वेदमन्त्र खालीलप्रमाणे होत -
3.2.1 होतृ - ऋग्वेद
यज्ञविधीतील प्रमुख पुरोहितास ‘होतृ’ अशी संज्ञा आहे. यज्ञातील मुख्य व इतर देवतांना
हवि अर्पण करताना तो ऋग्वेदातील मन्त्र म्हणतो. होतृ एकूण यज्ञविधीमध्ये अधीक्षकाची
भूमिका निभावतो असे म्हणता येते.
3.2.2 अध्वर्यु - यजुर्वेद
‘अध्वर्यु’ हा यज्ञविधीच्या इतर सर्व अङ्गांची व्यवस्था करतो. यज्ञासाठी भूमी तयार
करून घेणे, वेदी बान्धून घेणे, सर्व सामग्रीची व्यवस्थ करून घेणे, यज्ञात प्रत्यक्ष अग्नि
प्रज्वलित करणे, बळीचा पशु आणणे व योग्य मुहूर्तावर त्याचा बळी देणे, त्याचप्रमाणे
यज्ञाची साङ्गता करून दक्षिणेचे वितरण करणे इ० सर्व विधी अध्वर्यु करतो. यातील प्रत्येक
विधीचे मन्त्र यजुर्वेदात असून अध्वर्यु व त्याचे साहाय्यक पुरोहित त्या मन्त्रांचे
औचित्यानुसार पठण करतात.
3.2.3 उद्गातृ - सामवेद
यज्ञामध्ये, विशेषतः सोमयज्ञामध्ये, निरनिराळ्या ‘साम’ म्हणजे चालींवर वेदमन्त्रांचे गायन
करणारा जो पुरोहित त्यास ‘उद्गातृ’ अशी संज्ञा आहे. खरं म्हणजे सम्पूर्ण यज्ञभर
वेदमन्त्रांचे पठण होतच असते. तरीही उद्गातृ मात्र मन्त्रांचे निव्वळ पठन न करता ‘गायन’
करतात त्यामुळे हा विधी हा थोडासा मनोरञ्जनात्मक असावा. यज्ञाच्या प्रदीर्घ
कार्यक्रमामधे कुठेतरी मनाला थोडासा मोकळेपणा मिळावा व त्यानुषङ्गाने
काव्य-शास्त्र-विनोद घडावा ही यामागची भूमिका असावी असे वटते.
(हे सर्व लक्षात घेता सामवेदातून गान्धर्ववेद नांवाच्या उपवेदाची म्हणजेच
सङ्गीत-शास्त्राची उत्पत्ती झाली हे नवल नाही)
3.2.4 ब्रह्मन् - अथर्ववेद
‘ब्रह्मन्’ अशी संज्ञा असलेल्या पुरोहिताचे सम्पूर्ण यज्ञविधीवर बारीकपणे लक्ष ठेवण्याचे
कार्य असते. विधींमध्ये कुठेकी काही चूक घडली किंवा अनवधानाने एखादा विधी राहून गेला
तर अशाप्रकारच्या दोषाचे निवारण अथर्ववेदातील मन्त्रांच्या साहाय्याने करण्याची
जवाबदारी या ब्रह्माची आहे.
3.3 यज्ञाखेरीजचे वेदमन्त्र
आधी म्हटल्याप्रमाणे, निरनिराळ्या शास्त्रांशी सम्बन्धित मन्त्र हे त्या त्या
शास्त्रकारांच्या व अभ्यासकांच्या उपयोगाकरिता निर्माण झाले असावे.
उदा० अथर्ववेदातील वैदिक गणितासमबन्धीचे मन्त्र हे गणिते करतांना नुसते म्हणावयाचे नसून
त्यांत गणिताची सूत्रे आहेत. त्या सूत्रांचा उपयोग हा उचित ठिकाणी गणित
सोडवण्याकरिता किंवा वैज्ञानिक संशोधनाकरिता केला पाहिजे .
(अन्यथा एखाद्या इष्टी-यज्ञात अथवा ललितापूजेत ते मन्त्र रटण्याने निव्वळ उच्चार शुद्ध
होतात, घसा मोकळा होतो, ऐकणाऱ्यांचे मनोरञ्जन होते, आणि वातावरण भारल्यासारखे
होते, याव्यतिरिक्त इतर काही होत नाही.)
3.4 वेदप्रयोजन
वरील चर्चेतून वेद म्हणजे काय ते साधारण लक्षात येते. वेदांमध्ये प्रामुख्याने देवतांची स्तुती,
धर्माचरणासम्बन्धीचे सङ्केत, ईश्वरोपासनेचे प्रकार आणि सृष्टिनिर्मितीचे तत्वचिन्तन आहे.
इतर शास्त्रचर्चाही उदण्ड आहे, परन्तु कलौघात त्या चर्चेला द्वितीयत्व आले आणि
परमेश्वराबद्दलच्या व धर्माबद्दलच्या सर्व बाबींना आत्यन्तिक महत्त्व प्राप्त झाले. ही
चर्चा करण्याचे प्रयोजन म्हणजे वेदांच्या अपौरुषेयत्वाच्या कल्पनेचे बीज बरेचसे यात आणि
बाकीचे वेदांच्या शब्दप्रामाण्यात सापडते. इतर अनेक घटकांनी या कल्पनेचे पोषण केले आणि
अगदी २० व्या शतकातील अनेक पण्डितदेखील वेदांना अपौरुषेय मानतात.
(4) वेदांचे दृश्य (श्राव्य)
4.1 वेदांचे वाङ्मयीन रूप
सध्या वेद कोणत्या रूपात आपल्यापुढे आहेत हे पाहाणेही औचित्याचे ठरावे. वेदांची निर्मिती
झाली त्या काळात त्यांचे रूप हे थोडथोड्या प्रमाणात मनोऽनुभवात्मक, सैद्धान्तिक,
तात्त्विक, शास्त्रीय आणि वाङ्मयीन होते असे मानता येते. पण त्यानन्तर त्यांच्या
सन्धानाचा प्रश्न निर्माण झाल्यावर एकच माध्यम निश्चितपणे श्रेष्ठ ठरले ते म्हणजे
वाङ्मयीन रूप. बहुतांश वेदभागाला निर्मितीच्या वेळेसच वाङ्मयीन रूप प्राप्त झालेले होते,
तरीही, ज्या भागाचे रूप तसे नव्हते त्यास सहेतुकपणे वाङ्मयीन रूप देऊन त्याच्या सन्धानाची
व्यवस्था केली गेली.
4.2 मौखिकपरम्परेतून वेदांचे सन्धान
त्या काळात लिखाणाची साधने व्यावहारिक करणांस्तव दुर्लभ होती आणि म्हणून मौखिक
परम्परेनेच या वाङ्मयाची अखण्डता राखली गेली हा इतिहास सर्वांना माहित आहे. सम्पूर्ण
जगामध्ये केवळ मौखिक परम्परेद्वारे टिकून राहिलेल्या वाङ्मयापैकि वेदांइतके उत्कृष्ट, प्रचण्ड
आणि अक्षत असे दुसरे कोणतेही नाही. यामध्येच आपल्या मौखिक पमपरेचा गौरव आहेसे वाटते.
वैदिक मन्त्रांचे अक्षतत्व हा त्यांच्या अपौरुषेयत्वाकरिता आणखी एक आधार म्हणून वापरला जातो.
4.3 वेदांचे आपल्यापुढील रूप
अर्थात् आज आपल्यापुढे जे वेद आहेत ते वाङ्मयरूपात आहेत. म्हणजे त्यांतील दिव्यत्व,
अपौरुषेयत्व, प्राचीनत्व, इ० बाबी काही काळाकरिता दुर्लक्षित केल्यास वेदांची तुलना ही
आधुनिक काळातील कवितेशी करता येते.
चाऱ्ही वेद हे सम्पूर्णपणे मन्त्रात्मक आहेत. सामगायनातील चाली वगळल्या तरीही
वेदमन्त्रांना गेयता आहे. त्यांमध्ये निश्चितपणे एकप्रकारची निबद्धता दिसून येते. ऋषींना
वैदिक मन्त्र दिसले किंवा ते त्यांच्या प्रज्ञाचक्षूंपुढे प्रकट झाले असे जरी म्हटले तरीही
वाङ्मयीन रूपातील त्यांच्या रचनेमध्ये एक निश्चितशी सुसूत्रता दिसते. तसे जर नसते तर
छन्दःशास्त्राचा जन्मच झाला नसता.
ज्यार्थी या ऋषींना उत्स्फूर्तपणे अशी उत्कृष्ट काव्यसिद्धि जमली त्यार्थी त्या ऋषींचे इतर
शास्त्रांसोबतच वाङ्मयशास्त्रातही दीर्घकालीन प्रशिक्षण झालेले असावे अन्यथा त्यांच्या
नैसर्गिक प्रज्ञेला इतके सुबद्ध रूप प्राप्त झाले नसते. अपवादानेच एखादी व्यक्ती जन्मजात
प्रज्ञा-प्रतिभा घेऊन जन्मते आणि सुरुवतीपासूनच तिची काव्यनिर्मिती हि विशेष प्रकारची
होते, पण असे अपवाद शतकातून एखाद दोन कवी किंवा ऋषींच्या बाबतीत सम्भवतात. चाऱ्ही
वेद रचणाऱ्या ऋषींची सङ्ख्या एकत्रपणे जवळपास 500 च्या आसपास जाते हे लक्षात घेतल्यास
इतके अपवाद एकाच क्षेत्रात झाले हे मान्य करणे कठीण जाते.
या सर्व चर्चेचा मथितार्थ एवढाच, की आज उपलब्ध असलेल्या संहिता वाङ्मयाची
निर्मितीपासून सङ्कलनापर्यन्तची सम्पूर्ण प्रक्रिया अत्यन्त नियोजनबद्धपणे झालेली आहे.
त्यामागची प्रेरणा निश्चित उत्स्फूर्त असेल पण अंमलबजावणी मात्र अवश्य नियोजनबद्ध आहे
यात शङ्का नाही. आणि हे सगळे निव्वळ मौखिक परम्परेने साध्य केलेले आहे.
4.5 वेदांचे शब्द (ध्वनी) स्वरूप
पुस्तकातील लिखित स्वरूपातील वेद हे मूळ वेद नव्हेत तर गुरुकडून शिष्याकडे परम्परेने आलेले वेद
हेच मूळ वेद आहेत. काळाच्या ओघात त्यामध्ये विकार येऊ नये याकरिता शक्य तेव्हां ते लिहिले
गेले इतकेच त्या लिखाणाचे महत्त्व आहे.
वेद हे सम्पूर्णपणे वाङ्मयरूपातून आणि मौखिकपरम्परेने आपल्यापर्यन्त पोहोचले हे मान्य केले की
आणखी एक गोष्ट मान्य करावी लागते ती म्हणजे वेद शब्दरूप किंवा ध्वनिरूप आहेत. शब्द
‘नित्य’ म्हणजे ‘अपौरुषेय’ असतात, म्हणजेच शब्दांचा कुणीही निर्माता नसतो, ते
स्वतःस्फूर्त असतात असे मानले जाते. शब्दनित्यत्व म्हणजे नेमके काय हे जाणण्याकरिता
शब्दनिर्मितीची प्रक्रिया थोडक्यात पाहिली पाहिजे.
पाणिनीय शिक्षेत शब्दनिर्मिती अशाप्रकारे साङ्गितलेली आहे -
आत्मा बुद् ध्या समेत्यार्थान् मनो युङ्क्ते विवक्षया ।
मनः कायाग्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम् ।
मारुतस्तूरयसि चरन्मन्दं जनयति स्वरम् ॥
(मनुष्याला जे बोलणे अभीष्ट आहे त्याचा, बुद्धीच्या साहाय्याने, आत्मा निश्चय करतो. हा
निश्चय झाल्यावर आत्मा त्या गोष्टीस बोलू इच्छितो. आत्म्याने प्रेरित झालेले मन
शरीराच्या आभ्यन्तर वह्नीस उत्तेजित करते. हा कायाग्नी शरीरातील वायूस अभिलषित
स्वरयन्त्रातून निघण्यास प्रेरित करतो. हा वायू मग त्या विशिष्ट स्वरयन्त्रावर आघात
करतो आणि त्यातून शब्द उत्पन्न होतो. या प्रक्रियेतून निर्माण झालेला शब्द अर्थवाही
होऊन श्रोत्यास बोध करून देतो. )
भगवद्गीतेत हा कायाग्नि ईश्वरस्वरूप वर्णिलेला आहे. त्याचप्रमाणे हा वायू प्राणरूप असून
शरीरातून निःश्वासरूपाने प्रकट होतो. शब्दांची निर्मिती निश्वासाच्या साहाय्याने होते
हे तर आधुनिक विज्ञानही मान्य करते.
हा केवळ एका प्रकारचा शब्द झाला. मनुष्यनिश्वासजन्य शब्दाव्यतिरिक्त इतरही शब्द
(ध्वनी) सृष्टीत उत्पन्न होत असतात. याही शब्दनिर्मितीत वायू हा घटक असून तिथे मात्र
तो निराळ्या प्रकारे कार्यरत असतो. त्या सर्व शब्दांना सृष्टीचे निःश्वास मानले जाते.
सृष्टी ही अनादि-अनन्त म्हणजेच नित्य आहे. त्यामुळे त्या सृष्टीचे निश्वास म्हणजे ‘शब्द’ हे
नित्य असतात. ते स्वतःच सृष्टीमध्ये प्रकट होत असतात.
एखादा असे म्हणेल की शब्द केवळ बोलणाऱ्याच्या प्रयत्नानन्तरच व्यक्त होतात आणि
आपल्याला ते तेव्हांच ऐकू येतात. तर त्यावर ह्या सिद्धान्ताचे उत्तर असे आहे की आपण शब्द
ऐकतो-बोलतो याचा अर्थ आपल्या प्रयत्नाने ते निर्माण होतात व मग नष्ट होतात असा
नसून, बोलणाऱ्या आणि ऐकणऱ्याच्या इच्छा-सामर्थ्य-प्रयत्नानुसार ते वागिन्द्रिय व
श्रवणेन्द्रियांना केवळ गोचर होतात. एकदा अशी इच्छा-सामर्थ्य-प्रयत्न नष्ट झाले की
पुन्हा ते अगोचर स्थितीला जातात.
ज्याप्रमाणे शब्द हे सृष्टीचे निश्वास मानले जातात त्याचप्रमाणे वेदांनाही या सृष्टीच्या
निर्मात्याचे निश्वास मानले जाते आणि म्हणून वेदही नित्य मानले जातात. ऋग्वेदाचा
भाष्यकार सायणाचार्य आपल्या ऋग्वेदभाष्याभूमिकेत वेद हे परमेश्वराचे निश्वास असल्याचे नमूद
करतो. परमेश्वराचा निश्वास असल्यामुळे वेद अपौरुषेय आहेत असे मानलेठ
(5) वेदांची भाषा व तिचे नि)
5.1 देवभाषा संस्कृत
आधी उल्लेखिल्याप्रमाणे वेदांची भाषा ही 4 - 5 हजार वर्षांपूर्वीची संस्कृत भाषा आहे. ही
भाषा साहित्यिक आणि व्यकरणात्मक दृष्टीने अतिशय प्रगत आशी असून ह्या भाषेत शब्दसमृद्धी
रूपसमृद्धी भरपूर प्रमाणात आढळते. एकन्दरच ही भाषा तत्कालीन समाजाच्य अत्यन्त विकसित
अशा अवस्थेची निदर्शक आहे असे मानावयास प्रत्यवाय नाही. त्यामुळे या भाषेस ‘देवभाषा’
, ‘देववाणी’ अशी विशेषणे प्राप्त झाली.
अर्थात् या भाषेत निर्माण झालेल्या अतिप्राचीन आणि अत्युत्कृष्ट वाङ्मयास ‘देववाङ्मय’
मानले जाणे साहजिकच होते.
5.2 नैसर्गिकभाषा संस्कृत
काही विद्वानांचे मत तर असे आहे की जगात संस्कृत ही एकच भाषा नैसर्गिक आहे, बाकी सर्व
भाषा साङ्केतिक आहेत. साङ्केतिक भाषा नामरूपाचा सम्बन्ध जोडून शिकविली जाते. नैसर्गिक
भाषा ईश्वरकृपेने प्राप्त होते. आणि म्हणून ईश्वराचीच असलेली संस्कृत ही एकमेव नैसर्गिक
भाषा आहे.
वैदिक शास्त्राचा असा सिद्धान्त आहे की वस्तूचा आणि शब्दाचा मानवाच्या सङ्केताने न
जोडलेला असा काही सम्बन्ध असून तोच सम्बन्ध औत्पत्तिक सम्बन्ध आहे. तो सम्बन्ध उत्पत्तीने
सिद्ध होतो. त्या सम्बन्धाप्रमाणे, शब्दापासून वस्तूची प्रत्यक्ष उत्पत्ती होते म्हणून तो
खरा औत्पत्तिक सम्बन्ध. म्हणूनच वस्तूला ‘पदार्थ’ म्हणतात – ‘पद’ म्हणजे शब्द आणि
त्याचा खरा अर्थ म्हणजे ती वस्तू .
संस्कृताभिमान्यांच्या मतानुसार, केवळ संस्कृत भाषेतच या औत्पत्तिक अर्थानुसार पदसिद्धी
होते आणि म्हणून संस्कृतात निर्माण झालेल्या वेदांचा सृष्टीतील वस्तूंशी औत्पत्तिक सम्बन्ध
आहे. किम्बहुना ही सृष्टी म्हणजे शब्दस्वरूप वेदांचेच इतर महाभूतांच्या साहाय्याने झालेले
दृश्यरूपान्तर आहे. म्हणून वेद हे अपौरुषेय आहेत.
»
* प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
(6) आपौरुषेयत्वाचा सिद्धान्त
प्रेषक सौरभ् (मंगळ, 02/09/2010 - 10:37)
वेदांविषयी इतकी माहिती करून घेऊन त्यांचे साधारण स्वरूप लक्षात घेतल्यावर आपण आता
त्यांच्या अपौरुषेयत्वाकडे वळू. अपौरुषेयत्व म्हणजे नेमके काय याबद्दल अगदी थोडक्यात विचार करू.
या ठिकाणी पुन्हा व्याकरणात्मक विचार करावा लागेल.
6.1 अपौरुषेयत्व - व्याकरणात्मक विचार
अपौरुषेयत्व हे अपौरुषेय या शब्दाचे भाववाचाक नाम आहे . अपौरुषेय असण्याचा जो भाव त्या
भावाचे नांव अपौरुषेयत्व.
अपौरुषेय हे पद पौरुषेय या पदाचे नकारत्मक रूप आहे. पौरुषेय हे पद पुरुष या पदाचे तद्धित
रूप आहे. आता ‘पुरुष’ म्हणजे काय, हे पाहिल्यास, त्या शब्दाची उत्पत्ती साधारण अशी आहे :
पुरि शेते इति पुरुषः - नगरात जो झोपतो तो पुरुष.
(पुर् म्हणजे नगर किंवा शहर , तसेच, झोपणे असा अर्थ असलेल्या शीङ् या द्वितीय गणातील
धातूचे षः हे रूप आहे. नगरात किंवा शहरात जो झोपतो म्हणजे राहातो तो पुरुष).
याचे दोन अर्थ होतात – (1) देहरूपी नगरात राहाणारा तो पुरुष म्हणजे आत्मा. (2)
विश्वरूपी नगरात व्याप्त होऊन राहाणारा म्हणजे परमात्मा अर्थात् परमेश्वर.
(हा दुसरा अर्थ वेदांना अनेक ठिकाणी अभिप्रेत आहे असे म्हटले जाते. यजुर्वेदातील
पुरुषसूक्तात ज्या पुरुषाचे वर्णन आहे ते सगळे याला लागू पडते.)
यानुसार, पौरुषेय म्हणजे या पुरुषाशी सम्बन्धित किंवा याच्यापासून उत्पन्न झलेले जे काही
आहे ते. म्हणून, अपौरुषेय म्हणजे याच्यापासून उत्पन्न न झालेले, स्वतःच अस्तित्वात असलेले.
6.2 वेदांचे अपौरुषेयत्व
आता लक्षात घेण्यायोग्य गोष्ट अशी आहे की, वेदांच्या अपौरुषेयत्वाच्या सिद्धान्ताप्रमाणे
वेद हे या पुरुषाने म्हणजे परमेश्वरानेही निर्माण केले नाहीत. वेद हे कुणीच निर्माण केले
नाहीत कारण ते पूर्वीपासून आहेत व अनन्त काळापर्यन्त असेच असणार आहेत.
परमेश्वराबद्दलही असाच सिद्धान्त आहे की तो अनादि व अनन्त आहे. त्यामुळे अपौरुषेयत्वाचा
सिद्धान्त असा आहे की, किम्बहुना वेद हे परमेश्वराचेच रूप आहे.
‘परमेश्वराने वेद निर्मण केले’ असे म्हणणे म्हणजे ‘त्याने स्वतःला निर्माण केले’ असे
म्हणण्यासारखे असून ते अतार्किक आहे.
आता, वेदांचा कर्ता म्हणून परमेश्वरालाही जिथे नाकारले जाते तिथे मानवाचा काय पाड
लागणार ? त्यामुळे वेद हे मानवनिर्मित असल्याची चर्चा करणेदेखील चुकीचे आहे असे
वेदापौरुषेयत्ववाद्यांचे म्हणणे आहे.
»
* प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
6.3 वेद अपौरुषेय कशावरून ?
प्रेषक सौरभ् (मंगळ, 02/09/2010 - 10:38)
6.3.1 वेद म्हणजे ज्ञान व ज्ञान अपौरुषेय असते
वेद या शब्दाचा व्याकरणात्मक अर्थ आपण पहिला आणि त्यातून वेद म्हणजे ज्ञान हे आपल्या
लक्षात आले आहे. आता ज्ञान हे कुणीही निर्माण करू शकत नाही, ते स्वतःच अस्तित्वात
असते. उदा० 100 अंश सेण्टिग्रेड किंवा त्याहून अधिक तापमानाला पाण्याचे बाष्प होते ही
गोष्ट जरी वैज्ञानिकांनी शोधली असली, तरी पाण्याचे बाष्पीभवन ही एक नैसर्गिक
प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया काही कुणी निर्माण केलेली नाही आणि म्हणूनच अपौरुषेय अशी आहे.
त्याचप्रमाणे, वेद ज्या ज्या विषयांबद्दल प्रतिपादन करतात ते सर्व विषय (प्रामुख्याने -
परमेश्वर, ही सृष्टी, पञ्चमहाभूतादि नैसर्गिक तत्त्वे, इ०) हे मानवाधीन नसून अपौरुषेय
आहेत. त्यामुळे त्यंच्याबद्दलचे सत्य ज्ञान देणारे वेददेखील अपौरुषेयच असले पाहिजेत.
6.3.2 वेदांना निर्माता नाही
वेदांची तुलना इतर वाङ्मयाशी केल्यास हे लक्षात येते की वेदांचा म्हणून कुणी निर्माता
नाही. रामायण हे वाल्मीकींनी रचले किंवा मनुस्मृती मनुमहाराजांनी रचली, त्याप्रमाणे
वेदांचा रचयिता असा कुणी माहित नाही. वेदाध्ययन करणारे ऋषी मुनी व त्यांच्या
शिष्यपरम्परा यांतून केवळ वेद आपल्यापर्यन्त पोहोचले.
ज्या वेदांना कुणीही कर्ता नाही ते वेद पौरुषेय असूच शकणार नाहीत म्हणून ते अपौरुषेय आहेत.
6.3.3 वेदांचा प्रतिपाद्य विषय आणि त्याचे अपौरुषेयत्व
वेदांमध्ये प्रतिपाद्य विषय अनेक असले तरीही प्रामुख्याने वेद परमेश्वराबद्दल चर्चा करतात
असे मानले जाते. या सृष्टीच्या निर्मात्याविषयी ज्ञान देणे हे वेदांचे प्रमुख कार्य आहे.
वेदांतील अनेक मन्त्रांवरून हेही प्रतिपादन झालेले आहे की परमेश्वर हा
निर्गुण-निराकार-अनादि-अनन्त असा आहे, त्याचा कुणीही निर्माता नाही. अर्थात् तो
स्वयम्भू म्हणजेच अपौरुषेय आहे आणि त्यामुळे त्याचे सत्यज्ञान करून देणारे जे वेद ते देखील
अपौरुषेयच आहेत.
6.3.4 ऋषींना वेद दिसले
असे मानले जाते की अनेक ऋषींनी त्यांच्या प्रज्ञाचक्षूंद्वारे वेद पाहिले. त्यांनी वेद निर्माण
केले नसून, त्यांच्या प्रखर ज्ञानामुळे व तपश्चर्येमुळे ते वेद पाहू शकण्याच्या अवस्थेप्रत
पोहोचले आणि परमेश्वराने त्यांच्या ज्ञानचक्षूंपुढे वेद प्रकट केले. त्यांनी केवळ ते त्यांच्या
भाषेत (वेदकालीन संस्कृतात) आपल्या शिष्यांना साङ्गितले. पण मुळात परमेश्वराकडून प्राप्त
झालेले आणि या ऋषींच्या व्यक्तिगत रचना नसलेले वेद हे अपौरुषेयच आहेत.
6.3.5 शब्दनित्यत्व - वेदनित्यत्व – अपौरुषेयत्व
वरील लेखनखण्ड क्र० 4.5 मध्ये शब्दांच्या नित्यत्वाचा सिद्धान्त स्पष्ट झालेला आहे. शब्द
जर नित्य असतील तर शब्दरूप असलेले वेददेखील नित्यच असले पाहिजेत. नित्य म्हणजेच कधीही
नष्ट न होणारे.
आता, ‘निर्माण झालेली गोष्ट ही नष्ट होणारच’ हा याच सृष्टीचा नियम असल्यामुळे, वेद
हे जर नित्य म्हणजे कधीही नष्ट न होणारे असतील तर ते कधीही निर्माण झालेले नसून
अनादि काळापासून अस्तित्वात असलेले असे आहेत. याचाच अर्थ वेदांचा कुणी निर्माता नाही
अर्थात् ते अपौरुषेय आहेत.
6.3.6 धर्मप्रतिपादकत्वामुळे नित्यत्व
काही दार्शनिक असे मानतात की वेद हे धर्मप्रतिपादक आहेत. ‘धारयति इति धर्मः’ अशी
धर्माची सर्वसाधारण व्याख्या केली जाते आणि ही व्याख्या वैश्विक स्वरूपाची असल्याचेही
मानले जाते. धर्म हा जर विश्वाला धारण करत असेल तर हे विश्व जितके नित्य तितकाच
धर्मही नित्य आणि अशा धर्माचे प्रतिपादन करणारे वेदसुद्धा नित्य म्हणजे अपौरुषेयच आहेत.
6.3.7 परमेश्वर-निश्वासरूपी वेद
परमेश्वर अनादि-अनन्त आहे आणि म्हणून त्याच्या क्रियाही नित्य आहेत. वेद हे परमेश्वराचे
न?
Comments
Post a Comment