एकाच नाड्याची टोकं.

एकाच नाड्याची टोकं.

एकदा काय झालं; नाड्याची गाठ सुटेना. तशी सुटणं अवघड नव्हतं. कुठलही एक टोक मागं
सरलं तर गाठ सुटण्यासारखी होती.
पण कुठल्याच टोकाला मागं जाणं मंजुर नव्हतं. त्यापेक्षा,मोकळं होण्यासाठी एक्मेकाला ते खेचु
लागले. पण झालं उलटच. ताण वाढला. गाठ आणखी पक्की झाली.
खेचुन काहिच होत नाही म्हाल्यावर ते एकमेकाला ढकलु लागले.
त्यानं गाठीचा पीळ आणखीनच वाढला. आता तर गाठ सुटायची काहिच चिन्ह दिसेनात.
सुटका करुन घेण्यासाठी त्या दोन्ही टोकांनी आता जोर वाढवला. प्रचंड ओढाताण सुरु
झाली. आणि यातच...
यातच एक टोक तुटलं. गाठ एकदाची तुटली. दुसरं टोक खुश झालं .
"हुस्श्श सुटलो" म्हणुन त्यानं एक निश्वास टाकला. आणी विजयाचा अमप आनंद त्याच्या
इवल्याश्या मनात मावेना.आणि एवढ्यात...

एवढ्यात एक जीवघेणी कळ त्याच्या पाठितुन गेली. जणुन काही त्याचं शरीर कुणा अति
शक्तिशाली ताकदीनं हिसका देउन तोडल्यासारखं त्याला वाटलं. कुणीतरी करवतीनं त्याच्या
शरीर कापल्यासारखं त्याला झालं. मरणप्राय कळा सुरु झाल्या.
आणि त्याच्या डोक्यात विचार गेला चमकुन :-
"अरेच्चा ..आपण कुठं वेगळे होतो. आपण दोघही त्या एकाच नाड्याची टोकं.
एक अखंड , संपुर्ण पण जणु निद्रिस्त्/भ्रमित/स्वप्नाभासी नाडा. त्यातच तर आपण
सामावलोत. आपण ,म्हणजे हे टोक, सुरु तरी कुठं होतं आणि संपतं तरी कुठं? .....
आपलं खरं रूप नाडा. भ्रमित रुप टोकं.सत्य रुप अखंड्.स्वप्नावासी रुप खंडित.
कुठलही टोकं तुटलं तरी तुटणार आपणच होतो. आपलाच जीव कसनुसा करुन विजय आपण साजरा
करणार होतो.आपल्याल आपण वेगळे असल्याचा झाला निभ्रम. निव्वळ भ्रम. त्यातुनच आल्यात
ह्या कळा. असह्य वेदना"
हे जाणवत असतानाच अति तीव्र वेदनेनं त्याला ग्लानी येउ लागली. तो बेहोश होउ लागला.
.......

इकडं तुटलेल्या नाड्यालाही दोन टोकं शिल्लक होतीच. एकमेकांना पाहुन बोल्तं झाली.
एकमेकांना वेगळं समजु लागली.
द्वित्वाचा भास जन्माला आला होता.
त्या नाड्याला (स्वतःला ती दोन टोकं समजुन)तो त्यांचाच जन्म वाटत होता.

Comments

Popular posts from this blog

निषाद राज एकलव्य

तिब्बत देश का असली नाम " बोद " ( Bod ) है

The world’s 10 most awesome giant Buddhas